Headlines

शेटफळच्या महिलांचा डंका, विभागस्तरावर ‘उत्कृष्ट’:विभागातील 40 साधन केंद्रांमध्ये उल्लेखनीय कार्याची सिद्धेश्वर केंद्राची मोहोर, मुंबईमध्ये संस्थेचा सन्मान‎




महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिला जाणारा पुणे विभागातील ‘उत्कृष्ट साधन केंद्र’ हा बहुमान मोहोळ तालुक्यातील सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र, शेटफळने पटकावला आहे. विभागातील ४० साधन केंद्रांमधून शेटफळच्या या केंद्राने उत्कृष्ट साधन केंद्र पुरस्कार मिळवून आपल्या उल्लेखनीय कार्याची मोहोर उमटवली. मुंबई येथे ३० आणि ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित माविमच्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. माविमच्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. शेटफळ येथील सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्राने ग्रामीण महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उभारलेले उपक्रम कौतुकास्पद ठरले आहे. दूध संकलन व चारा व्यवस्थापन करून केंद्राने स्वतःचे दूध संकलन केंद्र सुरू केले असून, दररोज ५०० लिटर दुधाचे संकलन केले जाते. जनावरांसाठी स्वस्त चारा उपलब्ध व्हावा म्हणून ‘मुरघास’ निर्मितीचे प्रशिक्षण आणि विमा कवच देण्यात आले आहे. नीना फूडसोबत करार करून मका उत्पादक शेतकऱ्यांना तिहेरी फायदा मिळवून देण्यासाठी स्वीट कॉर्न विक्रीसाठी नामवंत नीना फूडस कंपनीशी करार करण्यात आला आहे. याप्रसंगी मन्सुर पटेल, विभागीय सल्लागार विलास बच्चे, सिद्धाराम माशाळे, दीपक टेकाळे, परमेश्वर इंगळे आणि राजकुमार पवार यांनी सन्मानचिन्ह स्वीकारले. तर सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र शेटफळच्या वतीने उपाध्यक्षा संगीता सावंत व व्यवस्थापक नितीन साठे यांनी हा पुरस्कार स्वीकारून आपल्या यशाचे श्रेय सर्व सदस्यांना दिले . सिद्धेश्वर सधन संस्था २०१० पासून नोंदणीकृत. महिला सक्षमीकरणासाठी या संस्थेने आतापर्यंत ३९७ बचतगट बांधले असून ४,२७० महिला जोडल्या गेल्या आहेत. संस्थेमार्फत दरवर्षी १० कोटींचे कर्जवाटप केले जाते. ‘नवतेजस्वीनी’ सहप्रोजेक्टअंतर्गत शेळीपालन, मदरपोल्ट्री, दुग्धडेअरी, बेबीकॉर्न व सोलर ड्रायर यासारखे उपक्रम चालवले जातात. स्मार्ट प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टर, अवजारे व पिकअप वाहनाची सोय आहे. १२ गावांमध्ये कार्यरत असलेल्या या संस्थेकडे १ एकर स्वतःची जमीन, २२ ग्रामसंघ, १४ सीआरपी व कर्मचारी वर्ग आहे. याशिवाय एचबी तपासणी, तिरंगा थाळी, परसबाग, मुलींचे स्वागत व आरोग्यविषयक जनजागृती असे विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. १२ गावांना ट्रॅक्टर, अवजारे, पीकअप वाहनाची मदत ४५० सदस्यांचा शेळीपालन व्यवसाय १०० महिलांचा पोल्ट्री व्यवसाय, ७८ सदस्यांचे बायोगॅस प्रकल्प आणि परसबाग उपक्रम यशस्वीरीत्या सुरू आहेत. महामंडळाच्या प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमात १०० टक्के उपस्थिती नोंदवून केंद्राने आपली शिस्त सिद्ध केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *