Headlines

मोताळा तालुक्यातील पलढग मध्यम प्रकल्प झाला "ओव्हरफ्लो':मध्यम प्रकल्पाची क्षमता 9.14 तर उपयुक्त जलसाठा 7.51 दलघमी‎




तालुक्यातील मध्यम प्रकल्प पलढग आज ७ ऑगस्ट रोजी, शुक्रवारी सकाळी शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नळगंगा प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. प्रकल्प ७८.२८ टक्के भरला आहे. प्रकल्पांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने प्रकल्पावरून पाणीपुरवठा होणाऱ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यंदा पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून तालुक्यात दमदार पाऊस पडला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील दोन्ही प्रकल्पांची पातळी खालावली होती. मागील काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. विश्वगंगा नदीवर बांधलेला पलढग मध्यम प्रकल्प आज ७ ऑगस्ट रोजी, शुक्रवारी सकाळी शंभर टक्के भरला आहे. त्याच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. या मध्यम प्रकल्पाची क्षमता ९.१४ दलघमी आहे. उपयुक्त जलसाठा ७.५१ दलघमी आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने हा मध्यम प्रकल्प आज शंभर टक्के भरला आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. विश्वगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पलढग मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने प्रकल्पावरून पाणीपुरवठा होणाऱ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सिंचनाचाही प्रश्न मिटला आहे. तसेच मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नळगंगा धरणात ७८.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या धरणावरून पाणीपुरवठा होणाऱ्या मोताळा, नांदुरा, मलकापूर या तीन तालुक्यांतील शंभरावर गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *