Headlines

विशेष मोहिमेत आरटीओने 2 खासगी बस:20 ऑटोंवर केली दंडात्मक कारवाई




प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) जिल्ह्यातील अवैध वाहतुकीविरुद्ध विशेष वाहन तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित तांबटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर शेख यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरात १०० हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. यात फिटनेस, परवाना व कागदपत्रांची वैधता संपलेल्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली. टॉवर चौक व बसस्थानक परिसरात केलेल्या कारवाईत नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या ११ ऑटोरिक्षा आणि दोन खासगी बस जप्त करण्यात आल्या आहेत तर २० ऑटोंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही विशेष मोहीम पुढेही सुरुच राहणार असून यासाठी वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक किरणकुमार लोणे, अनिरुद्ध देवधर, संदीप तायडे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विनोद जाधव व ममता इंगोले यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. वाहनधारकांनी वाहनांची सर्व आवश्यक कागदपत्र वेळेत अपडेट करून घ्यावीत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन आरटीओ विभागाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *