Headlines

खामगाव आगाराला विठुराया पावले:पंढरपूर यात्रा स्पेशल एसटी बसेसच्या माध्यमातून मिळाले 46 लाखांचे उत्पन्न प्रतिसाद




पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी तत्पर सेवा आहे. आगार प्रमुख पवन टाले यांच्या योग्य नियोजनामुळे येथील आगाराला यंदा ४६ लाख रुपयांच्या वर उत्पन्न मिळाले. त्यामुळे खामगाव आगाराला विठुरायाच पावले आहेत. आषाढ महिना लागला की विठ्ठल भक्तांची पाऊले पंढरीकडे वळतात. कोणी खासगी वाहनाने प्रवास करतो. कोणी एसटीच्या बसने प्रवास करून पंढरीची वारी करतो. दरवर्षी पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणाऱ्या प्रवासी भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता, यंदा खामगाव आगारातून ३५ पंढरपूर यात्रा बसचे नियोजन करण्यात आले होते. परंतु नियोजनापेक्षा २४ बसेस अधिक, म्हणजे एकूण ५९ बसेस प्रवाशांना घेऊन पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या. यावरून प्रवाशांना येथील आगारातील तत्पर सेवा आवडली. बसचा प्रवासही सुखकर ठरला. त्यामुळे बसमधून प्रवास वाढला. म्हणून नियोजनापेक्षा अधिक बसेस सोडाव्या लागल्या, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. येथील आगारातून १९ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात आल्या. या ५९ बसमधून उपरोक्त दहा दिवसांच्या कालावधीत ९३४९ प्रवाशांनी प्रवास करून पंढरपूर गाठले. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या विविध सवलतींसह एकूण ४६ लाख १६ हजार ७३२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे खामगाव आगाराच्या उत्पन्नात भर पडली आहे. सहा गावांतून पंढरपूरसाठी ४५ प्रवासी मिळाले होते. तसेच नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार खामगाव आगारातून थेट पंढरपूरसाठी त्या-त्या गावांतून बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे या गावांतील नागरिकांना गावातूनच थेट पंढरपूरला जाण्याची सुविधा मिळाली. त्यामुळे अनेकांनी आगार प्रमुख पवन टाले यांचे आभार व्यक्त केले. पंचाहत्तर वर्षांवरील नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत एसटी बसमधून मोफत प्रवासाची सवलत आहे. या सवलतीचा २४०३ प्रवाशांनी लाभ घेतला. महिला सन्मान योजनेच्या सवलतीचा २६३० प्रवाशांनी लाभ घेतला. ज्येष्ठ नागरिक सवलतीचा १०२२ प्रवाशांनी लाभ घेतला. इतर सवलतीचा ६३५ प्रवाशांनी लाभ घेतला. २६५९ प्रवाशांनी तिकिटाची पूर्ण रक्कम देऊन पंढरपूर वारी केली. दर्शनासाठी रेल्वेच्याही फेऱ्या खामगाव येथील रेल्वे स्थानकावरून खामगाव ते पंढरपूर विठ्ठल दर्शनासाठी दोन फेऱ्या सोडण्यात आल्या. तरीही खामगाव आगाराने मिळवलेले ४६ हजार रुपयांच्या वरचे उत्पन्न खरोखरच आगाराच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *