Headlines

‘धनराज ज्वेलर्स' फोडले; सोने-चांदीचे दागिने लंपास:आमदार निवासाजवळ घरफोडी; चोरटे सीसीटीव्हीत‎




शहरातील राऊतवाडी परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हैदोस घालत सराफा दुकान फोडले तसेच तीन फ्लॅटमध्ये घरफोडीचा प्रयत्न केला. या धाडसी चोरीमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत. ही घटना स्थानिक आमदारांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर घडल्याने पोलिस सुरक्षा व रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राऊतवाडी परिसरात ही घटना घडली. चोरट्यांनी ‘धनराज ज्वेलर्स’ या सराफ दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. तसेच त्याच इमारतीमधील दोन ते तीन बंद फ्लॅट्समध्ये चोरीचा प्रयत्न केला. सध्या सिव्हिल लाईन पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाची (डीबी) दोन पथके आणि एलसीबीचे पथक सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. या धाडसी चोरीमुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) पथके घटनास्थळी दाखल झाली. फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाला (डॉग स्कॉड) तातडीने पाचारण करण्यात आले. वैज्ञानिक व तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. अंगात जॅकेट, चेहऱ्यावर मास्क सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, अंगात जॅकेट आणि चेहऱ्यावर पूर्ण मास्क लावलेले तीन संशयित आरोपी कटरच्या साह्याने कुलूप तोडताना दिसत आहेत. ओळख लपवण्यासाठी आरोपींनी पूर्ण काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *