Headlines

मुंढेगाव-अस्वली स्टेशन मार्गाची दुरवस्था; रुग्णवाहिकाही अडकली:पर्यायी मार्गाच्या छोट्या मोरीवरील पुलाच्या बाजूंचा रस्ताही खचला‎



इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव – अस्वली स्टेशन मार्गाची अवस्था दयनीय आणि धोकादायक झाली आहे. प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या मार्गावरील पुलाचे काम चार वर्षांपासून रखडलेले असून, पुलाचे बांधकाम अर्धवट

.

पर्यायी मार्ग म्हणून असलेल्या छोट्या मोरीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंचा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत असून, अनेकदा वाहने या ठिकाणी अडकून वाहतूक विस्कळीत होत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेचा गंभीर फटका नुकताच एका गर्भवती महिलेला बसला. महिलेला बेळगाव-कुऱ्हे आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जात असताना रुग्णवाहिका या खचलेल्या रस्त्यात अडकून पडली. त्यामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यास विलंब होण्याची परिस्थिती निर्माण झाली. या मार्गावरून दररोज शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र, चार वर्षांपासून पुलाचे काम रखडलेले असतानाही संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

^मोरीवरून पाणी असले की रस्ता बंद होतो. मग डेअरीवर दूध देता येत नाही. आता ये-जा होत असली तरी दुचाकीवरून दुधाच्या किटल्या घेऊन गाडी चालवता येत नाही. कित्येकदा स्लिप होऊन दुधाचे नुकसान तर झालेच परंतु दुखापत होण्याच्या घटनाही घडतात. रस्ता पक्का करा, मगच मते मागायला या. – कैलास संधान, दुग्ध व्यावसायिक

रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शासनामार्फत मंजूर झालेले असून, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे व काम सुरू करण्यात येणार आहे. वळणमार्गाची देखभाल तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. – तुषार मोरे, अभियंता सा.बां. वि.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *