![]()
राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला अंबादास दानवे यांनी लावलेल्या उपस्थितीवर बोलताना सामंत म्हणाले की, दानवे संघावर सातत्याने टीका करतात, मात्र तिथे जाऊन त्यांनी सिद्ध केले आहे की, ते मनापासून टीका करत नाही, तर कुणाच्या तरी दबावाखाली येऊन टीका करतात. “अंबादास दानवेंची टीका मनापासून नसते, त्यांनी बोध घ्यावा” अंबादास दानवे यांच्या आरएसएसच्या कार्यक्रमातील उपस्थितीवर बोलताना उदय सामंत यांनी त्यांना टोला लगावला. सामंत म्हणाले, “दानवे नेहमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत असतात. मात्र, काल स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी हे सिद्ध केले आहे की, ते मनापासून संघावर टीका करत नाहीत. ते जी काही टीका करतात, ती कुणाच्या तरी दबावाखाली येऊन करतात का? याचा आता आपण अभ्यास केला पाहिजे.” तसेच, “काल ते तिथे गेले होते, म्हणजे नक्कीच तिथून एखादा चांगला बोध घेऊन भविष्यातील राजकीय वाटचाल करतील,” असा चिमटाही त्यांनी काढला. जरांगेंना चर्चेचे आवाहन आणि प्रमाणपत्रांवर स्पष्टीकरण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “महायुती सरकार मराठा समाजाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे की, काही गैरसमज असतील तर ते आपण चर्चेतून दूर करूया. त्यांच्या ज्या काही शंका असतील, त्या आम्ही नक्कीच सोडवू.” एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची स्पष्ट भूमिका घेतली असल्याचे सांगत सामंत पुढे म्हणाले, “माझ्याकडे सध्या अचूक आकडा नाही, पण मी खात्रीने सांगतो की आतापर्यंत हजारो कुणबी प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. ज्यांच्या नोंदी असूनही काही तांत्रिक कारणास्तव प्रमाणपत्रे रद्द झाली आहेत, त्यावरही आमचे काम सुरू आहे.” पवार गटाच्या खासदारांच्या मोदी भेटीवर प्रतिक्रिया दरम्यान, शरद पवार गटाचे खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, याविषयी सामंत म्हणाले, हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर मी अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. हेही वाचा.. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळे,मी बोकांडी बसलो तर उठणार नाही: सरकारने मुस्लिम, धनगर-मराठा समाजाची गळचेपी केली- मनोज जरांगे पाटील सरकार जसा त्रास मराठा समाजाचे खरे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आम्हाला देत आहे, तसाच त्रास त्यांनी मुस्लिम, धनगर, शेतकरी आणि मायक्रो ओबीसी बांधवांनाही दिला आहे. मात्र, हे सरकार आमचे आणि मुस्लिम बांधवांचे काहीच वाकडे करू शकत नाही. आमचे अधिकार रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावे, असा आक्रमक सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. माढा येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. सविस्तर वाचा
Source link
अंबादास दानवे कुणाच्या दबावाखाली टीका करतात?:मोहन भागवतांच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून उदय सामंतांचा सवाल