![]()
येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांवर कुणाला संधी द्यावी? या मुद्यावर सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत जोरदार माथापच्ची सुरू आहे. त्यातच आता शिवसेना गटाकडून या जागेसाठी दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्यासह 6 जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यात ठाकरे गटाची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे ठाकरे गट अंधारेंना विधान परिषदेवर संधी देणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. यापैकी 9 जागा या नियमित असून, 1 जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक संपल्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होईल. विधानसभेतील संख्याबळानुसार, सत्ताधारी भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 5 जागा येणार आहेत. तर त्यांचे मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेला 2, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. यात विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघी 1 जागा येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवर जाणार की? आपल्या इतर एखाद्या नेत्याला संधी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेतील या आमदारांचा संपणार कार्यकाळ सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. पण स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यास उत्सुक आहे. त्यांची आपल्या एखाद्या सहकाऱ्याला विधान परिषदेवर पाठवण्याची इच्छा आहे. यात विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्त्या सुषमा अंधारे, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजन विचारे, माजी आमदार वैभव नाईक, सचिव सूरज चव्हाण आदींची नावे चर्चेत आहेत. पण यातही दानवे व अंधारे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने ज्योति वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवले आहे. वाघमारे ह्या एक दलित नेत्या आहेत. यामुळे शिवसेनेची सर्वसामान्यांतील प्रतिमा काहीशी उंचावली आहे. त्यामुळे ठाकरे गटही सुषमा अंधारेंना विधान परिषदेवर संधी देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः सुषमा अंधारे यांची पक्षावरील टीका परतावून लावण्याची क्षमता पाहताही ठाकरे त्यांच्या बाजूने आपला कौल देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषदेतील या आमदारांचा संपणार कार्यकाळ विधान परिषदेची पोटनिवडणूक
Source link
उद्धव ठाकरे विधान परिषदेवर सुषमा अंधारेंना संधी देणार?:अंबादास दानवे, विचारे, नाईक, चव्हाणांचेही नाव चर्चेत; 12 मे रोजी इलेक्शन