महिलांना आरक्षण मिळावे ही शरद पवार यांची भूमिका यापूर्वी देखील होती आणि सुप्रिया सुळे यांची देखील तीच भूमिका आहे. महिला आरक्षणासाठी शरद पवारांनी सर्वांत आधी भूमिका घेतली. आता डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणासंदर्भात शरद पवारांचा पक्ष योग्य भूमिका घेईल, अ
.
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाली आहे हे जनतेला माहिती आहे. वैचारिक सुंता झाल्याने तुम्ही ‘औरंगजेब फॅन क्लब’ चालवत आहात; तुमची खरोखर सुंता सुद्धा झाल्याची शक्यता आहे. आम्ही टेस्ट करायला तयार आहोत, पण राऊत पळ काढत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊतांनी अलिबागमधील कुठल्याही गावातून ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी; भाजपचा सामान्य कार्यकर्ता त्यांचा पराभव करून दाखवेल. महापालिका सोडा, हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक लढवा; कोण मर्द आहे याचा फैसला जनता करेल. संजय राऊत यांनी केलेले अनेक दावे कधीच खरे ठरले नाहीत. राऊतांना जे कधीच वाटले नाही तेच पुढे होणार आहे. जसे तुमचे 40 आमदार तुम्हाला सोडून गेले, खासदार सोडून गेले ते तुम्हाला कळले नाही, तसेच आता यापुढे काय होते ते पाहत राहा.
ठाकरेंचा पक्ष आता ‘बचत गट’ झालाय
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत आज म्हणाले की आमचे सरकार येईल त्यावेळी भाजप 80 टक्के रिकामी होईल. पण ते हे विसरले की मविआचे सरकार होते त्यावेळी भाजपच्या आमदारांना फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण एकही आमदार फोडता आला नाही. सलग अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, गिरीश महाजन यांच्यावर गुन्हे दाखल केले, परंतु राऊत आणि त्यांच्या मालकांना भाजपचा एक साधा कार्यकर्ता किंवा नगरसेवकही फोडता आला नाही. स्वप्न बघायला टॅक्स लागत नाही, राऊतांना शुभेच्छा! तुमच्या कार्यकाळात 1 रुपयाचा निधीसुद्धा भाजप आमदारांना दिला नाही. 80 टक्के भाजप रिकामा करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या राऊतांनी आपला पक्ष कसा बचत गट झाला आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे.
शरद पवार अन् सुप्रिया सुळे स्वाभिमानी नाहीत का?
नवनाथ बन म्हणाले की, राऊत नेहमी सांगतात की आमचा पक्ष फोडला म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटायला जाणार नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत. मग याचा अर्थ शरद पवार आणि सुप्रिया सुळे स्वाभिमानी नाहीत का? नरेंद्र मोदी यांना भेटायला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 8 खासदारांवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. तुम्ही तुमचा स्वाभिमान काँग्रेसच्या चरणी अर्पण केला आहे. खरी शिवसेना जनतेने एकनाथ शिंदेंना दिली आहे. तुमच्याकडून पक्ष पेलवला जात नव्हता म्हणूनच जनतेने पक्ष शिंदेंना दिला. हे ही वृत्त वाचा आमची सत्ता येऊ द्या, पक्ष कसे फुटतात ते दाखवून देऊ:संजय राऊतांचा भाजपला इशारा, जयंत पाटलांच्या विमान प्रवासावरही लगावला टोला

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबतची नियोजित भेट, राज्यात झालेले पक्षांतर आणि जयंत पाटील यांच्या विमान प्रवासाच्या मुद्द्यांवर राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि खोचक शब्दांत उत्तरे दिली. सत्ता गेल्यावर भाजपची अवस्था ‘माचीसच्या रिकाम्या बॉक्ससारखी’ होईल, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. वाचा सविस्तर