Headlines

राजे होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांचा हिंगोलीत सत्कार:खासदार डॉ. रामराव वडकुते यांच्या हस्ते सन्मान




राजे होळकर घराण्याचे तेरावे वंशज भुषणसिंह राजे होळकर यांचा सत्कार खासदार डॉ. रामराव वडकुते यांच्या हस्ते शिवशंभो प्रतिष्ठान हिंगोली व पत्रकार वेल्फेअर सोसायटी हिंगोलीच्या वतीने करण्यात आला. यावेळी रामराव वडकुते यांनी पत्रकारांच्या गृहसंकुलाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. हिंगोली येथे शिवशंभो प्रतिष्ठान हिंगोली व पत्रकार वेल्फेअर सोसायटी हिंगोली यांच्या वतीने राजे होळकर घराण्याचे तेरावे वंशज भुषणसिंह राजे होळकर यांचा सत्कार रामराव वडकुते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आला. यावेळी राजे भुषणसिंह होळकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध सामाजिक विषयांवर चर्चाही केली. यावेळी खासदार वडकुते यांनी आगामी काळातील विकास कामांसाठी त्यांची भूमिका तसेच मराठवाडा व राज्याच्या विकासासाठी राज्यसभेत मांडलेले मुद्द्यांची माहिती दिली. मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याची मागणी ही राज्यसभेत केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर रामराव वडकुते यांनी पत्रकार वेल्फेअर सोसायटीच्या वतीने गृहसंकुल कामाचा आढावा घेतला. आवश्यक बाबीवर मार्गदर्शन करुन लवकरच हस्तांतरणाची प्रक्रिया मार्गी लागेल असे सांगितले. यावेळी शिवशंभो प्रतिष्ठाण व पत्रकार वेल्फेअर सोसायटीचे पदाधिकारी कल्याण देशमुख, सुनिल पाठक, संदीप नागरे, प्रकाश इंगोले, उमेश नागरे, ऍड.रावण धाबे, विजय गुंडेकर, पल्लवी मुदगल, डॉ.नामदेव कोरडे, प्रसाद आरर्वीकर यांच्यासह पंढरीनाथ ढाले पाटील, निखिल बांगर, ऍड.सुरेश गडदे सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *