Headlines

पहिल्याच दिवशी 400 टन मोसंबीची आवक:पाचोडला मोसंबी खरेदी-विक्रीस सुरुवात, प्रतिटन 12 ते 18 हजार रुपये दर‎




पाचोड गतवर्षीच्या झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला विसरून पुन्हा नव्या दमाने यंदाच्या मोसंबी हंगामाला पाचोड (ता. पैठण) येथील मोसंबी मार्केटमध्ये सोमवारी (ता.१०) पासून शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे हित जोपासत सुरुवात झाली आहे. दरम्यान, मोसंबी खरेदीच्या पहिल्याच दिवशी जवळपास ४०० टन मोसंबीची आवक झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे, मोसंबी मार्केटचे अध्यक्ष अय्युब पठाण व केंद्रप्रमुख गणेश फसाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवंगत आडूळचे मोसंबी व्यापारी गणीभाई शेख यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या मोसंबीच्या दुकानापासून पहिली बोली लावून मोसंबीच्या खरेदी-विक्रीला सुरुवात करण्यात आली. गतवर्षी झालेल्या जोरदार व अतिवृष्टीचा मोठा फटका मोसंबीला बसला होता. त्यामुळे मृग बहाराची फूट कमी होऊन उत्पादन घटले होते. शिवाय देशभरात लांबलेला पाऊस या कारणास्तव मोसंबीची परराज्यात मागणी घटली होती. त्यामुळे मोसंबीचे दर पडले होते. याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यामुळे पाचोडच्या मोसंबी मार्केटला कोट्यवधीचे नुकसान सहन करावे लागले होते. परराज्यातील व्यापारी खरेदीसाठी दाखल होण्याची अपेक्षा आहे. पैठण तालुक्यातील मोसंबीला दिल्ली, आग्रा, मथुरा, कोलकाता, चेन्नई, वाराणसी, लखनऊ, बेंगळुरू, राजस्थान, गुजरात, कानपूर, मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक या बाजारपेठांमध्ये मागणी आहे. ^शेतकऱ्यांना मशागत उत्पादित एकंदरीत खर्च आजच्या बाजारपेठेत न परवडणारा असून शासनाने अन्य पिकाप्रमाणे मोसंबीला विम्याचे कवच देण्यात यावे व इतर पिकांप्रमाणे मोसंबीला हमीभाव द्यावा. -मनोहरखाँ पठाण , थेरगाव ^मार्केटमध्ये चांगल्या प्रतीच्या मालाला १८ ते २० रुपये भाव असून हलक्या मालाला दहा ते पंधरा रुपये भाव आहे. यावर्षी आंध्र प्रदेश, मराठवाड्यातील मोसंबीची आवक सुरु झाली आहे. मोसंबीला जास्त उठाव नसल्याने दर कमी आहे. -काशिनाथ बोरकर आडत दुकानदार, पाचोड कोलकाता, चेन्नई, वाराणसी येथून मागणी मोसंबीला विम्याचे कवच द्यावे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *