Headlines

श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिरासाठी 410 कोटींचा आराखडा:नवरात्रोत्सवानंतर काम सुरू होण्याची शक्यता, एमएसआयडीसीने तयार केला आराखडा‎




श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिरासाठी ४१० कोटींचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला असून याबाबत शासनाकडून आर्किटेक्ट भिवगडे त्यांच्या सहकाऱ्यांसह मंदिर संस्थानात पोहोचले. दुपारी दोन तास भिवगडे यांची दोन्ही संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. तसेच विकास आराखड्यात ज्या सुधारणा सुचवण्यात आल्या त्याच्याही नोंदी शासनाच्या वतीने घेण्यात आल्या. विकास आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवी मंदिर परिसराचा नागपुरातील श्री कोरडी देवी अंबा महालक्ष्मी मंदिर परिसराप्रमाणे कायापालट होणार आहे. दोन्ही संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सुधारणांशी भिवगडे यांनी सहमती दर्शवली. मार्च महिन्यापासून श्री अंबादेवी व श्री एकविरा देवी मंदिर विकास आराखडा प्रारूप चर्चेत आले आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागाने संपूर्ण परिसराचा आराखडा तयार केला असून गर्भगृहाला कोणताही धक्का न लावता, मंदिर, परिसराचे सौंदर्यीकरण, नुतनीकरण, भाविकांना जास्तीत जास्त आरामदायक सुविधा देण्याचा आराखड्यात प्रयत्न करण्यात आला आहे. या आराखड्याला लवकरच अंतिम मंजुरी मिळेल, असा विश्वास संस्थानांद्वारे व्यक्त करण्यात आला तसेच नवरात्रोत्सवानंतर नव्या विकास आराखड्यानुसार काम सुरू होईल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली. कारण, जमिनीचे अधिग्रहण करण्याच्या कामाला सर्वप्रथम सुरुवात केली जाईल. प्रारूप आराखडा तयार झाला, त्यात दुरुस्त्याही सुचवल्या ^श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, नुतनीकरणासाठी ४१० कोटींचा प्रारूप आराखडा तयार झाला असून त्यात दुरस्त्याही सुचवण्यात आल्या आहेत. एमएसआयडीसीचे आर्किटेक्ट, वास्तू अभियंत्यांनी दोन्ही मंदिरांची नुकतीच पाहणी केली. – डॉ. जयंत पांढरीकर, सचिव, श्री अंबादेवी संस्थान.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *