Headlines

BJP Slams Sanjay Raut Over Politics


गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेवर संजय राऊत केवळ राजकारण करत आहेत आणि राजकीय पोळी भाजत आहेत. राऊतांनी स

.

आश्रमशाळा काँग्रेस नेत्याची, मग राऊत काँग्रेसला जाब विचारणार का?

सर्पदंशाच्या घटनेचा संदर्भ देत बन म्हणाले, “ज्या आश्रमशाळेत हा प्रकार घडला, ती संस्था काँग्रेसचे अनेक वर्षे खासदार राहिलेले आणि स्थानिक नेते मारोतराव कोवासे यांची आहे. राज्य सरकार प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन हजार रुपये अनुदान देते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी ही संस्थाचालकाची असते. आश्रमशाळेच्या खिडकीजवळ लाकडांचे आणि विटांचे ढिगारे होते, जे सापांसाठी पूरक वातावरण निर्माण करतात. मग संजय राऊत एवढ्या पोटतिडकीने जो जाब सरकारला विचारत आहेत, तो ते काँग्रेस नेत्याला विचारणार आहेत का? मारोतराव कोवासेंची हकालपट्टी करण्याची मागणी ते राहुल गांधींकडे करणार आहेत का?”

राऊतांनी मारोतराव कोवासेंच्या घरी साप सोडावेत

“संजय राऊतांनी आवाहन केले आहे की मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर साप सोडा. मी त्यांना सांगू इच्छितो की, घटनेला प्राथमिक जबाबदार असणाऱ्या संस्थाचालक मारोतराव कोवासे यांच्या घरी त्यांनी आधी साप सोडावेत. तसेच हर्षवर्धन सपकाळ आणि राहुल गांधींच्या घरी जाऊन साप सोडण्याची हिंमत राऊतांनी दाखवावी. केवळ खासदारकी मिळवण्यासाठी ते काँग्रेसची लाचारी करत आहेत,” असा टोला बन यांनी लगावला.

संजय राऊत जनतेचे नाही, तर दलालांचे नेते

संजय राऊतांच्या ‘मी जनतेचा विरोधी पक्षनेता आहे’ या विधानावर पलटवार करताना बन म्हणाले, “संजय राऊत हे जनतेचे विरोधी पक्षनेते नसून ते दलालांचे नेते आहेत. काँग्रेसची आणि सोनिया गांधींची दलाली करणे एवढेच त्यांचे काम आहे. विरोधी पक्षनेता कसा असतो, हे अडीच वर्षे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. राऊतांनी पत्राचाळीचा आणि मविआ सरकारच्या काळात रोज वसूल होणाऱ्या 100 कोटींचा हिशेब आधी जनतेला द्यावा.”

गडचिरोलीत नक्षलवाद संपला, त्यामुळे यांना पोटशूळ

“देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीतील नक्षलवाद संपला आहे. तिथे रस्ते, आरोग्य, पाणी आणि शिक्षणाच्या उत्तम सुविधा पोहोचल्या आहेत. स्थानिक आदिवासींना मुख्य प्रवाहात आणले जात आहे, हे संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बघवत नाही. आदिवासी खितपत पडावेत, अशी त्यांची सुप्त इच्छा आहे. 1500 आदिवासींचा मृत्यू झाल्याचा राऊतांचा आकडा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे,” असा दावा त्यांनी केला.

अमित शहांच्या नावाने राहुल गांधींनी पळ काढला

अमित शहा संसदेत का येत नाहीत, या राऊतांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “जेव्हा अमित शहा संसदेत आले, तेव्हा राहुल गांधींनी सभागृहातून पळ काढला. पळपुटेपणा कोण करतंय हे संपूर्ण देशाने पाहिले. ‘घरबसे’ कोण आहेत हे एकदा संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारावे.”

वंदे मातरम आणि तिरंग्याचा अपमान खपवून घेणार नाही

लाल किल्ल्यावर गायल्या जाणाऱ्या ‘वंदे मातरम’ला आणि तिरंगा रॅलीला संजय राऊतांनी विरोध केल्याचा आरोप करत बन म्हणाले, “लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच ‘वंदे मातरम’ गायले जाणार आहे. पण अबू आझमी आणि समाजवादी पार्टीच्या दबावाखाली राऊत याला विरोध करत आहेत. तिरंगा घेऊन येणाऱ्यांना राऊत ‘मनोरुग्ण’ म्हणतात. तिरंग्यामुळेच तुम्ही स्वातंत्र्यात जगता आहात, याचा त्यांना विसर पडला आहे. राऊत स्वतः रोज सकाळी चहामधून भांग पिऊन पत्रकार परिषद घेतात, त्यामुळे त्यांना सर्व जग मनोरुग्णच वाटते. तिरंग्याचा आणि वंदे मातरमचा अपमान जनता कदापि खपवून घेणार नाही.”

हेही वाचा…

मंत्र्यांच्या घरात साप-विंचू सोडा, मग मृत्यूचं भय कळेल!:गडचिरोलीतील मृत्यूंवरून संजय राऊतांचा संताप, म्हणाले- अमित शहांना तरुणांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल

गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत धक्कादायक घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आदिवासींची मुले सर्पदंशाने आणि विंचू चावल्याने मरत आहेत, तर दुसरीकडे हजारो आदिवासी खनिज कंपन्यांच्या गाड्यांखाली चिरडून मरत आहेत. हे सरकार केवळ आदिवासींच्या जीवावर उठले आहे,” अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.