Headlines

महिलांनी संविधानिक हक्कांची जाणीव करून घ्यावी:ॲड. परिक्रमा खोत यांचे प्रतिपादन; मोहोळमध्ये ‘महिलांशी सुसंवाद’ कार्यक्रम‎




संविधानाने महिलांना दिलेले अधिकार व हक्क यांची जाणीव महिलांना झाल्याशिवाय त्या सामाजिक बंधनातून पूर्णपणे मुक्त होणार नाहीत. घरातील परंपरा, कर्मकांडे, श्रद्धा, व्रत-वैकल्ये, उपवास-तापास यांसारख्या प्रथा महिलांनी स्वीकारल्या आहेत. त्यामुळे या प्रथा वर्षानुवर्षे नव्हे तर शतकानुशतके चालत आल्या आहेत. मात्र,त्यांचा चिकित्सक विचार करून महिलांनी स्वतःला या बंधनातून कधी मुक्त करणार असल्याचे प्रतिपादन अंनिसच्या संविधान जागर राज्य समन्वयक तथा मानवी हक्क व लैंगिक न्याय कार्यकर्त्या ॲड. परिक्रमा खोत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) स्थापना दिन व क्रांती दिनानिमित्त मोहोळ शाखेच्या वतीने ‘महिलांशी सुसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच दरम्यान करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मोहोळ अर्बन को-ऑप.बँकेच्या माजी अध्यक्षा संगिता फाटे अध्यक्षीय भाषणात संगिता फाटे यांनी उपवासाच्या प्रथेबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या, उपवास करू नका. आहारात बदल म्हणून उपवास करायचा असेल तर ठीक मात्र उपवासाच्या दिवशी अनेकदा नेहमीपेक्षा जास्त आहार घेतला जातो आणि तळलेले, आरोग्यास अपायकारक पदार्थ खाल्ले जातात. शाबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थही टाळावेत. त्याऐवजी एक दिवस मोबाईल न वापरण्याचा उपवास करा. असे सांगितले. अध्यक्षस्थानी होत्या. कवयित्री व साहित्यिका डॉ. स्मिता पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून ‘अभिवादन तुम्हाला डॉक्टर दाभोलकर’ या अभिवादन गीताने करण्यात आली. अंनिसचे राज्य शाखा सचिव सुधाकर काशिद यांनी प्रास्ताविक केले. तर संध्या फाटे यांनी ॲड. परिक्रमा खोत यांचा परिचय करून दिला. महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी अंनिसचे राज्य सचिव सुधाकर काशिद, ॲड. गोविंद पाटील, धर्मराज चवरे, रमेश अदलिंगे, नंदकुमार फाटे, डॉ. स्मिता पाटील, स्नेहल पाटील, आकाश फाटे, डॉ. सागर फाटे, मनोज मोरे, नामदेव कुचेकर, ॲड. आकाश कापूरे, शहाजी देशमुख, रमेश दास, दीपक पारडे, बाळासाहेब चौधरी, आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज चवरे यांनी केले, तर रमेश अदलिंगे यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *