Headlines

मुलोद्योग जीवन शिक्षण शाळेतील 160 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण:विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेना; शिक्षणासाठी दिले प्रोत्साहन‎




टिळक राष्ट्रीय विद्यालयाद्वारा संचलित मुलोद्योग जीवन शिक्षण प्रणालीच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या १६० गरजू विद्यार्थ्यांना चोपडा परिवाराच्या वतीने मोफत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत चोपडा परिवार गेल्या १३ वर्षांपासून हा उपक्रम अविरत राबवत आहे. कार्यक्रम संस्थाध्यक्ष सु. रा. अजबे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सुरेश चोपडा, विमल चोपडा, पायल चोपडा, अशोक झुंझुनूवाला, मुख्याध्यापक आर. के. राठोड यांची या वेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक आर. के. राठोड यांनी प्रास्ताविक केले. चोपडा परिवाराच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. गेल्या १३ वर्षांपासून विद्यार्थ्यांना सातत्याने मोफत गणवेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना आधार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढेही असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुरेश चोपडा, विमल चोपडा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मन लावून शिक्षण घेण्याचा संदेश दिला. शिक्षणातून स्वतःची प्रगती साधा. कुटुंबाची प्रगती साधा. देशाची प्रगती साधा, असे आवाहन केले. शिक्षण ही उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करा, असा संदेश दिला. पायल चोपडा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ः इयत्ता पहिली ते चौथीतील १६० विद्यार्थ्यांना यंदा मोफत शालेय गणवेश देण्यात आला. नवीन गणवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक उपक्रमातून मिळणारे असे प्रोत्साहन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारे ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन चोपडा परिवाराकडून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याबद्दल संस्थाध्यक्ष सुधाकर अजबे यांनी आदर व्यक्त केला. समाजसेवेची ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. समाजातील सक्षम घटकांनी शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास क्षेत्रात पुढाकार घ्यावा. गरजूंसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल बंड यांनी केले. बावणे गुरुजी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल उकर्डे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. १३ वर्षांपासून मदतीचा हात चोपडा परिवाराकडून टिळक राष्ट्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा उपक्रम गेल्या १३ वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. शिक्षणाच्या वाटचालीत आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत, यासाठी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मदतीचा आधार दिला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *