![]()
फुले-आंबेडकर विद्वत सभा जिल्हा शाखा अकोलाच्या वतीने लोकशाहीर डॅा. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रा. राहुल माहुरे यांचे ‘अण्णाभाऊ साठे जीवन चरित्र व आंबेडकरी चळवळीतील योगदान’ या विषयावर अशोक वाटिका सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…… यांनी कष्टकऱ्यांच्या अश्रूला साहित्याचे रूप दिले, असे प्रा. माहुरे म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समन्वयक, फुले-आंबेडकर विद्वत सभा.डॉ. संजय पोहरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री पुंडलीक महाराज महाविद्यालय, नांदुरा येथील वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्रा.राहुल माहुरे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय समन्वयक, फुले-आंबेडकर विद्वत सभा सिध्दार्थ देवदरीकर, डॉ. संदीप डोंगरे,अॅड. मुरलीधर इंगळे विचार मंचावर उपस्थित होते.अण्णाभाऊंच्या साहित्यात मार्क्सवाद व आंबेडकरवाद यांचा समन्वय दिसून येतो, असे अध्यक्षीय भाषणात डॉ.. संजय पोहरे यांनी नमूद केले.संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते कामगार संघटनांपर्यंत त्यांच्या लोककलांनी (लावणी, पोवाडे) महत्त्वाची भूमिका बजावली. आजच्या व्याख्यानातून त्यांच्या बहुआयामी योगदानाचा परिचय वक्त्यांनी करून दिला ही बाब उल्लेखनीय आहे, असेही डॉ. पोहरे म्हणाले.मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दार्थ देवदरीकर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमा मागची भूमिका आणि विद्वत्त सभेचे कार्य विषद केले. ॲड. मुरलीधर इंगळे यांनी समायोचित भाषण केले. सूत्रसंचालन दादा गवई यांनी तर आभार प्रदर्शन भाऊराव सोनोने यांनी केले. कार्यक्रमासाठी फुले-आंबेडकर विद्वत सभा जिल्हा शाखा अकोला चे सर्व सदस्य उपस्थित होते. दलित साहित्याचे जनक प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना प्रा राहुल माहुरे यांनी सांगितले की, मराठी तसेचं दलित साहित्याचे जनक मानले जाणारे अण्णाभाऊ सुरुवातीच्या काळात जरी साम्यवादी विचारांनी प्रभावित होते तरी अण्णाभाऊंनी आपली प्रसिद्ध ‘फकिरा’ कादंबरी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली. ‘पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नव्हे, तर कष्टकऱ्यांच्या हातावर आहे’ या त्यांच्या वक्तव्यामुळे जातीय व वर्गीय शोषणाविरुद्धची भूमिका अधोरेखित झाली, असेही ते म्हणाले.
Source link
कष्टकऱ्यांच्या अश्रूला साहित्याचे रूप देणारे अण्णा भाऊ साठे- प्रा.राहुल माहुरे:फुले-आंबेडकर विद्वत सभेकडून जयंतीचे आयाेजन; मान्यवरांकडून मार्गदर्शन