Headlines

आमझरी, खटकली परिसरात पर्यटन संकुल उभारण्याचे आयुक्तांचे निर्देश:होम-स्टे लाभार्थ्यांशी लीना बनसोड यांनी साधला संवाद‎




चिखलदरा तालुक्यातील आमझरी व खटकली या गावात पर्यटन विकासाच्या मोठ्या संधी असून स्थानिक आदिवासी समाजाला नव्या रोजगाराच्या मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने येथे पर्यटन संकुल उभरण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्त व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिले. येथील वनविभागाच्या आमझरी संकुलात आयोजित संवाद बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.या बैठकीला प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, सह आयुक्त दिगंबर चव्हाण, उपायुक्त संतोष ठुबे, उपायुक्त विनिता सोनवणे, उपायुक्त शशिकला अहिरराव, शबरी महामंडळाचे शाखा व्यवस्थापक गणेश साखरे, वरिष्ठ सल्लागार प्रशांत ब्राह्मणकर आणि विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक नागरिक व पर्यटन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. स्थानिकांनी पारंपरिक व उत्स्फूर्त पद्धतीने मान्यवरांचे स्वागत केले आणि आदिवासी बांधवांनी संवाद सत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.बैठकीत लीना बनसोड यांनी सांगितले की, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन योजना राबवल्या जात आहेत.आमझरी व खटकली भागातील नैसर्गिक सौंदर्याचे संवर्धन करताना स्थानिक संस्कृती, परंपरा आणि आदिवासी खाद्यपरंपरेला जागतिक पातळीवर ओळख देण्याचे काम आदिवासी विकास विभाग करीत आहे. त्यांनी या परिसरासाठी एक सर्वसमावेशक व आकर्षक टुरिस्ट प्लॅन तयार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. पर्यटकांना भेट देण्यासारख्या स्थळांचे, अनुभवांचे व मार्गनिदर्शनाचा संपूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. पर्यटकांना स्थानिक आदिवासी खाद्यसंस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देता यावा, यासाठी पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींचे अधिकृत दस्तऐवजीकरण करणे आणि त्यामुळे स्थानिक महिलांना व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत उपस्थित स्थानिक नागरिक व होम-स्टे लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल सकारात्मकता व्यक्त करण्याची तयारी दर्शविली. पुढील टप्प्यांबद्दल व तांत्रिक बाबींबाबत तपशीलवार नियोजन केले जाईल, असेही बैठकीत सांगण्यात आले. स्वच्छतेसाठी कठोर नियमावली पर्यावरण रक्षणसोबत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर नियमावली लागू करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. पर्यटकांनी कचरा करू नये यासाठी आचारसंहिता तयार करण्यात येईल व परिसरातील नियमित साफसफाई व्यवस्था राबवली जाईल,असे यावेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची माहिती देऊन पर्यटनाला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे. आदिवासींची पारंपरिक कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि हस्तकला यांद्वारे पर्यटनाला अधिक प्रभावी बनवण्याचे उपक्रम राबवले जातील. पर्यटन विकासात रस्ते व कनेक्टिव्हिटीचे महत्त्व लक्षात घेऊन या भागातील रस्ते विकासावर व संबंधित पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्यात येईल, असेही आयुक्तांद्वारे सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *