![]()
प्रतिनिधी | अमरावती नांदगावपेठ एमआयडीसीत पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क केंद्र शासनाकडून मिळाले त्याला दोन ते अडीच वर्षे उलटली तरी विकासाची संथगती बघता हा पार्क केव्हा पूर्णत्वास जाणार. येथे केव्हा मोठी गुंतवणूक येणार, केव्हा लाखोच्या संख्येत रोजगार मिळणार, असे एका अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. येथे येण्यास उत्सुक असलेल्या कंपन्यांची संख्या फारच मोजकी आहे. १०२० एकर जागेतील या पार्कमध्ये १० हजार कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा असली तरी १५० भूखंडांपैकी अद्याप केवळ ५ कंपन्यांसोबत एमओयू झाले आहेत. त्यापैकी ४ कंपन्यांनी भूखंड खरेदी केले आहेत. त्यामुळे हा टेक्सटाईल पार्क पूर्ण क्षमतेने तयार होण्यास तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ३ लाख रोजगार मिळण्यास नेमका किती कालावधी लागणार याबाबत अजुनही अनिश्चितता आहे. येथे युनिट स्थापन होण्यास आणखी किमान ६ महिने तरी लागतील, अशी माहिती शासकीय यंत्रणेसह तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क हा पांढऱ्या सोन्याच्या नगरीसाठी वरदार असलेला प्रकल्प ठरेल, म्हणून शेतकरी वर्गासह रोजगार मिळवण्यास इच्छुकांना चांगलाच आनंद झाला होता. कारण, येथे कापूस विक्री करून चांगले दर मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. जिल्ह्यात सुमारे २.५ लाख हेक्टर अशा मोठया क्षेत्रात कापसाचे उत्पादन होते. येथील कापूस उत्पादकांना नेहमीच हमीभाव मिळत नाही. अशात जर पूर्ण क्षमतेने पीएम मित्रा पार्क सुरू झाला तर कापसाला मागणी वाढून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडल्याशिवाय राहणार नाही. विविध कामांसाठी आघाडीवर राहणाऱ्या जनप्रतिनिधींपैकी कोणीही पीएम मित्राबाबत अवाक्षरही काढेनासे झाले आहे. त्यामुळे राज्य शासनावर दडपण येईनासे झाले असून परिणामी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे काम ज्या वेगाने पुढे सरकणे अपेक्षित होते, त्या वेगाने ते पुढे जाईनासे झाले आहे. येथे १५० भूखंड असून याला धड सुरुवातही म्हणता येणार नाही. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमध्ये जास्तीत जास्त कंपन्या याव्यात यासाठी जमिनीचा दर ५९० प्रति चौरस मीटर अर्थात भारतातील सर्व पीएम मित्रा पार्कच्या तुलनेत हा सर्वात किफायतशीर दर ठरवला गेला आहे.वीजेचा दर ५.५० प्रति युनिट (सरासरी बिलिंग दर). (तसेच विदर्भ आणि मराठवाड्यासाठी राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत वीज दरावर सबसिडी,सवलतीचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे पाण्याचा दरही १७.७५ प्रति किलोलीटर निश्चित करण्यात आला आहे. चार कंपन्यांनी भूखंड घेतले ^पीएम मित्रा पार्कसाठी ज्या पाच कंपन्यांचे एमओयू झाले आहे. त्यापैकी चार कंपन्यांनी येथे भूखंड खरेदी केले आहेत. अर्थात संपूर्ण प्रक्रियेंतर्गत प्रस्ताव सादर करून त्यांनी हे भूखंड खरेदी केले आहेत. येत्या चार ते सहा काम सुरू होण्याची शक्यता आहे. – राम लंके, विभागीय अधिकारी.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘पीएम मित्रा टेक्सटाइल पार्क’मध्ये 150 भूखंड, एमओयू 5 कंपन्यांसोबत, 10 हजार कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा, 3 लाख रोजगाराची प्रतिक्षा