![]()
‘टीईटी’ पेपर फुटी प्रकरणाचे कनेक्शन आता सोलापूरपर्यंत आल्याचे उघड झाले आहे. भिवंडी पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे. त्यापैकी काहींच्या जबाबातून सोलापूरमधील पोलिस भरती पूर्वप्रशिक्षण केंद्राचा चालक प्रकाश पवार (रा. सोरेगाव) याचाही रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पवारला अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधारांना परीक्षार्थींची कागदपत्रे पुरवल्याचा त्याच्यावर ठपका आहे. न्यायालयाने त्याला 15 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्याच्याकडे 26 विद्यार्थ्यांचे पेपर सापडले, त्यामध्ये 20 उत्तीर्ण झालेल्यांचे पेपर आढळून आले. त्यापैकी 5 पेपर टीईटी उत्तीर्ण झालेल्यांचे असल्याचा संशय आहे. रॅकेटचे नेटवर्क तीन- चार राज्यांत पोलिस पाळेमुळे खोदण्यात व्यग्र 28 जून रोजी महाराष्ट्रात टीईटीची परीक्षा होणार होती. मात्र त्यापूर्वीच ठाणे, भिवंडीत 27 जून रोजीच हा पेपर फुटला. त्यामुळे परीक्षाच रद्द करण्यात आली, ती अजून झाली नाही. उमेदवार त्याची वाट पहात आहेत. दुसरीकडे, या रॅकेटचे धागेदोरे दिल्ली, आग्रा आणि बिहारपर्यंत पोहोचले आहेत. आता सोलापूरची त्यात भर पडली. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याला भिवंडी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. उर्वरित काही आरोपींना दिल्ली, आग्रा आणि बिहार येथून अटक करण्यात आली. प्रकाश पवार हा सोलापूरमध्ये पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रासोबतच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी ध्रुव प्रतिष्ठान नावाने प्रशिक्षण संस्था चालवतो. भिवंडी पोलिसांनी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींना पवार याने काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे पुरवली होती. ही कागदपत्रे कोणत्या उद्देशाने देण्यात आली होती, याचा तपास पोलिस करत आहेत.या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर लोकांशी पवारचा काही संबंध आहे का , याचाही शोध घेतला जात आहे. आर्थिक गैरव्यवहार, विद्यार्थ्यांची कागदपत्रे आणि गैरप्रकारांशी जोडलेल्या इतर बाबींचाही पोलिस तपास करत आहेत. शिक्षकाची नोकरी सोडून प्रशिक्षण संस्था सुरु केली, मात्र कोविडनंतर अधोगती प्रकाश पवार हा मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होता. परंतु तिथे त्याचे मन रमले नाही. शिक्षकाची नोकरी सोडून त्याने 2011 कुमठा भागात पोलिस प्रशिक्षण संस्था सुरु केली. संस्थेस चांगला प्रतिसाद मिळत होता. त्याचे काही विद्यार्थी सोलापूरातही पोलिस म्हणून कार्यरत आहेत. मात्र कोविड नंतर आरोग्याविषयी समस्या निर्माण झाल्याने पवार याने प्रशिक्षण संस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. मात्र सध्याही संस्थेत काही प्रवेश असल्याचे सांगण्यात आले.
Source link
टीईटी पेपरफुटीचे सोलापूर कनेक्शन:पोलिस प्रशिक्षण अकॅडमीचा चालक अटकेत; 26 विद्यार्थ्यांचे पेपर सापडले, प्रकाश पवार भिवंडी पोलिसांच्या ताब्यात