Headlines

‘कमवा अन् शिका’च्या 3 हजार प्रशिक्षणार्थींचे संभाजीनगरातील बजाज ऑटोसमोर आंदोलन:पदवीसह मानधनवाढीची मागणी; कामगारांसारखे राबवून घेत असल्याचा आरोप



‘कमवा अन् शिका’ संकल्पनेअंतर्गत टीम लीज फाउंडेशनमार्फत बजाज ऑटो कंपनीत विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत सुमारे ३ हजार युवक-युवतींनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी (११ ऑगस्ट) सकाळी सहापासून बजाज ऑटोच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘काम बंद’ आंदोलन केल

.

पदवी न मिळणे, अल्प मानधनावर कामगारांप्रमाणे काम करून घेणे असा आरोप करत मानधनात वाढ न करणे व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या संधींबाबत अनिश्चितता, या मुद्द्यांमुळे प्रशिक्षणार्थींमध्ये नाराजी होती.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर २ ते ३ हजार प्रशिक्षणार्थी जमा झाले. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.

कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रशिक्षणार्थी शांत झाले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींच्या प्रतिनिधींची कंपनी व्यवस्थापनासोबत भेट घडवून आणली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दौलताबाद, वाळूज, छावणी व वाळूज एमआयडीसी पोलिसांची मदत घेतली. सकाळी ७ वाजता कंपनीच्या गेटवरून ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्यात आला होता.

३ वर्षांनंतर पदवीचे आश्वासन

‘कमवा अन् शिका’ योजनेंतर्गत ३ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बेंगळुरू येथील जैन विद्यापीठाकडून पदवी देण्याचे आश्वासन टीम लीज फाउंडेशनने दिल्याचा प्रशिक्षणार्थींचा दावा आहे. मात्र, अनेक प्रशिक्षणार्थींच्या कागदपत्रांबाबत अडचणी निर्माण झाल्याने पदवी मिळाली नाही. त्यांच्याकडून कामगारांप्रमाणे काम करून घेतले जात असल्याचे प्रशिक्षणार्थींचे म्हणणे आहे.

राजीव बजाज भेटणार राज ठाकरे यांना

युवक-युवतींच्या प्रश्नांवर सकारात्मक व त्यांच्या हिताचा मार्ग काढण्यासाठी बजाज ऑटो कंपनीचे सर्वेसर्वा राजीव बजाज हे येत्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *