Headlines

Maharashtra FDA Action; Ayurvedic Drug Licenses Cancelled


महाराष्ट्रातील आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. राज्यभरातील तब्बल 434 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची व्यापक तपासणी करण्यात आली. या तपासणीत नियमांचे उल्लंघन आणि गंभीर त्रुटी आढळलेल्या 10 संस्था

.

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांविरोधात झालेल्या मोठ्या कारवायांपैकी ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

434 संस्थांची तपासणी, 135 कंपन्यांना नोटिसा

राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या कामकाजाची व्यापक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, कच्चा माल, औषधांची चाचणी, उत्पादन नोंदी, लेबलिंग तसेच उत्पादन परिसरातील स्वच्छता आणि आवश्यक उपकरणांची उपलब्धता यांची पाहणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान अनेक संस्थांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले. गंभीर स्वरूपाच्या त्रुटी असलेल्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात आली. एकूण 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

काही संस्थांमधील त्रुटी इतक्या गंभीर होत्या की त्याचा थेट परिणाम औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेवर होण्याची शक्यता होती. त्यामुळे अशा संस्थांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या 10 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे परवाने कायमचे रद्द

  1. मे. कृष्णा हर्बल, बारामती, पुणे
  2. मे. लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स, करंजा, गोंदिया
  3. मे. आदित्य फार्मा, वडेगाव, तिरोडा, गोंदिया
  4. मे. अंगरस आयुर्वेद, वडेगाव, तिरोडा, गोंदिया
  5. मे. कालिदास गांधी, पुणे
  6. मे. शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी, सिन्नर, नाशिक
  7. मे. इंडुकेअर फार्मा प्रा. लि., जेजुरी एमआयडीसी, पुरंदर, पुणे
  8. मे. हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर, अमरावती
  9. मे. हिलॅरियस आयुर्वेद, एमआयडीसी मुंडीपार, गोंदिया
  10. मे. यशोदा लॅब प्रा. लि., नाशिक रोड, नाशिक

नेमक्या कोणत्या त्रुटी आढळल्या?

एफडीएच्या तपासणीत काही संस्थांमध्ये औषध उत्पादनाशी संबंधित मूलभूत नियमांचेही पालन होत नसल्याचे समोर आले. काही ठिकाणी मान्यताप्राप्त तांत्रिक व्यक्ती अनुपस्थित असतानाही औषध उत्पादन सुरू असल्याचे आढळले.

तसेच काही संस्थांमध्ये गुणवत्ता नियंत्रण विभागच कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले. उत्पादन आणि औषधांची चाचणी करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणे उपलब्ध नसल्याचेही तपासणीत आढळले.

काही उत्पादन परिसर अस्वच्छ असल्याचे आणि निर्धारित निकषांनुसार त्यांची रचना नसल्याचे समोर आले. याशिवाय बॅचनुसार उत्पादनाच्या नोंदी, कच्च्या मालाच्या नोंदी आणि औषधांच्या चाचणीचे अभिलेखही काही ठिकाणी उपलब्ध नव्हते.

काही संस्थांच्या औषधांच्या लेबलवर चुकीचा उत्पादन दिनांक नमूद करण्यात आल्याचेही तपासणीत आढळले. कच्चा माल आणि तयार औषधांची आवश्यक चाचणी उपलब्ध नसणे, मंजूर नकाशानुसार उत्पादन परिसर नसणे, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणाच्या नोंदी नसणे, नियंत्रण नमुने आणि मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड उपलब्ध नसणे, अशा त्रुटीही आढळल्या.

विशेष म्हणजे, औषधांमधील वेगवेगळे घटक एकमेकांत मिसळले जाऊ नयेत यासाठी आवश्यक कार्यपद्धतीही काही ठिकाणी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

औषधांच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होण्याची शक्यता

आयुर्वेदिक औषधे नैसर्गिक घटकांपासून तयार केली जात असली तरी त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे निकष पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. कच्च्या मालाची योग्य तपासणी न करणे, उत्पादनाची नोंद न ठेवणे, तयार औषधांची चाचणी न करणे किंवा उत्पादन परिसरात स्वच्छतेचे निकष न पाळणे यामुळे औषधांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

याच कारणामुळे तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळलेल्या संस्थांविरोधात एफडीएने कठोर भूमिका घेतली आहे. 434 संस्थांची तपासणी आणि 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई यामुळे आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादन प्रक्रियेवर प्रशासनाचे लक्ष अधिक कडक झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा..

डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करू नका, हायकाेर्टाने एफडीएला फटकारले:कॅडिला कंपनीच्या कारवाईवर ताशेरे; कंपनीला नोटीस बजावण्याचे आदेश

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करताना अधिकारांचा वापर तारतम्याने करावा. डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करू नका, अशा तीव्र शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले आहे. कॅडिला फार्मास्युटिकल्सच्या २.४५ कोटी रुपयांच्या ॲसिलॉक औषधांच्या साठ्यावर एफडीएने थेट विक्रीबंदी घातली होती. या कारवाईविरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेतली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.