वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट-पीजी’ (NEET-PG) परीक्षेच्या आयोजनात पुन्हा एकदा मोठा सावळागोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रांच्या वाटपावरून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून, याच मुद्द्यावरून राष्ट्रव
.
नेमका गोंधळ काय?
आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एका विद्यार्थ्याचे उदाहरण देत प्रशासनाच्या कारभाराकडे लक्ष वेधले आहे. एका विद्यार्थ्याला नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सकडून (NBE) आलेल्या मेसेज आणि ईमेलमध्ये त्याचे परीक्षा केंद्र ‘हैदराबाद’ असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, जेव्हा त्याच विद्यार्थ्याने अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले प्रवेशपत्र किंवा माहिती तपासली, तेव्हा तिथे त्याचे परीक्षा केंद्र ‘पुणे’ दाखवण्यात येत आहे.

या प्रकारावर संताप व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले, “एकाच विद्यार्थ्याला दोन वेगवेगळी माहिती दिली जात आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी नेमके कुठले परीक्षा केंद्र गृहीत धरायचे? हा भोंगळ कारभार आहे!”
‘राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण खाते करतेय काय?’
याआधीही परीक्षा केंद्रांवरून मोठा वाद झाला होता. महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्रातच परीक्षा केंद्र मिळावे, त्यांना इतर राज्यांत परीक्षेसाठी पाठवले जाऊ नये, अशी भूमिका आपण वारंवार मांडली होती, याची आठवण रोहित पवार यांनी करून दिली.
मात्र, राज्य सरकारने या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारकडे आणि संबंधित यंत्रणांकडे योग्य तो पाठपुरावा केला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. “राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण खाते नेमके काय करते, हाच मोठा प्रश्न आहे,” अशा शब्दांत पवारांनी राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर आणि शिक्षण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
रोहित पवारांनी पोस्ट केलेले फोटो…
घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली:4 जणांचा मृत्यू; 3 ते 4 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. येथील चिरागनगर परिसरात गौसिया चाळीवर अचानक डोंगराचा मोठा कडा (दरड) कोसळल्याने दोन ते तीन घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत चौैघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, आणखी 3 ते 4 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा