घराच्या कपाटात वर्षानुवर्षे पडून राहिलेल्या आणि न वापरलेल्या जुन्या कपड्यांना आता एक नवी दिशा मिळणार आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि कपड्यांचा पुनर्वापर (Recycling) वाढवण्यासाठी ‘रिफाइबर’ (Refiber) या संस्थेने ओटररीच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2026 म्हणजेच या
.
मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या मोहिमेला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता हा उपक्रम संपूर्ण देशभरात राबवला जाणार आहे.
मुंबईत 2.7 टन कपडे जमा; मॉडेल झाले यशस्वी!
या मोहिमेची सुरुवात जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त मुंबईत करण्यात आली होती. ‘मुंबई टेक्सटाइल सर्क्युलर इकॉनॉमी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट’ अंतर्गत अवघ्या काही दिवसांत मुंबईकरांनी तब्बल 2.7 टन वापरलेले कपडे जमा केले. 257 नागरिकांकडून 275 कलेक्शन ऑर्डर्स मिळाल्या. शहरातील 15 लॉन्ड्री पार्टनर्सच्या 28 शाखांचा वापर करून हे कपडे गोळा करण्यात आलेत.
विशेष काय?
यासाठी कोणतेही वेगळे लॉजिस्टिक्स नेटवर्क उभे न करता, शहरातील आधीपासूनच उपलब्ध असलेल्या सेवा नेटवर्कचा प्रभावी वापर करण्यात आला, ज्यामुळे ही मोहीम अत्यंत सोपी आणि यशस्वी ठरली.
कशी काम करणार ही मोहीम?
आता ही मोहीम देशभर विस्तारत असून, नागरिकांना त्यांच्या घरातील न वापरलेले कपडे देण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. नागरिक थेट ‘रिफाइबर ॲप’ वर जाऊन कपडे पिकअपसाठी बुक करू शकतात. जमा झालेले हे कपडे पुन्हा वापरण्यासाठी, रिसायकलिंगसाठी आणि पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जातील.
दिग्गज संस्थांचा पाठिंबा
या मोहिमेला अधिक मजबूत करण्यासाठी उद्योग, सरकार आणि सामाजिक संस्था एकत्र आल्या आहेत. ही मोहीम टिसर, भारतातील वस्त्र निर्माता संघ (CMAI), संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना (UNIDO) आणि लायन्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त सहकार्याने राबवली जात आहे.
या ऑनलाइन उपक्रमात महाराष्ट्र सरकारच्या टेक्सटाइल कमिश्नर वृंदा देसाई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, “कपड्यांचा योग्य वापर, पुनर्वापर आणि रिसायकलिंगबाबत जनजागृती होणे आणि त्यात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेणे काळाची गरज आहे.”
“मुंबईतील प्रोजेक्टमधून कपड्यांचा कचरा सोप्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणावर जमा करण्याचा मार्ग स्पष्ट झाला आहे. आता देशभर टेक्सटाइल रिसायकलिंगला चालना देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”— श्री. श्रीकांत भांगडिया (चेअरमन, रिफाइबर इनिशिएटिव्ह)

“तंत्रज्ञान आणि उपलब्ध नेटवर्कच्या मदतीने कपडे जमा करणे सोपे झाले आहे. मुंबईच्या अनुभवानंतर आता देशातील इतर शहरांमध्येही हे मॉडेल नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.”— श्री. मनोज वनवारी (COO, ओटररी आणि रिफाइबर)

कपाटात कोंडलेल्या कपड्यांना कचऱ्यात फेकण्याऐवजी त्यांना रिसायकल करून पर्यावरणाला हातभार लावण्याची ही सुवर्णसंधी नागरिकांना या मोहिमेच्या माध्यमातून मिळणार आहे.