अमित शहा काल संसदेत आल्यानंतर राहुल गांधी यांनी पळ काढला. राहुल गांधी हे पळून जाणारे नेतृत्व आहे, ते पराभव झाला की पळून जातात, त्यामुळे पळणारे आणि प्रश्नांची उत्तरे देणारं कोण नेतृत्व आहे जनतेला माहिती आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्
.
नवनाथ बन म्हणाले की, गडचिरोलीतील आश्रम शाळेचा परवाना रद्द करत दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आदिवासी विकास मंत्री तिथे जात शाळेची पाहणी करणार असून पुढील कारवाईचे आदेश देणार आहेत. संजय राऊत यांना माझा सवाल आहे की ती शिक्षण संस्था काँग्रेस नेत्याची आहे जे 3 वेळा आमदार आणि 1 वेळेस खासदार होते, राऊत त्यांना सवाल करणार का? असा सवाल बन यांनी केला आहे.

..तर कोर्टाच्या नावाने खडे फोडू नका
नवनाथ बन म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने जर शिवसेनेच्या चिन्हावर जर शिक्कामोर्तब केला तर त्यांच्या नावाने खडे फोडू नका. कारण निवडणूक आयोगाने तुमच्याविरोधात निकाल दिला तर तो दलाल होतो, कोर्टाच्या निकालाचे स्वागत राऊतांनी केले पाहिजे, दुटप्पीपणे वागू नये. महिला आरक्षणासंदर्भात शरद पवार हे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील.
राऊत काँग्रेसला सवाल करणार का?
नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना संजय राऊत यांनी सवाल केला पाहिजे की तुमचा नेता शाळेत घोटाळा करतो, विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी खाटा देत नाही आणि तुम्ही आदिवासी विकासाच्या गप्पा मारणार का? असा सवाल राऊतांनी काँग्रेसला केला पाहिजे. विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाही.सरकार अनुदान देते पण ते खर्च करण्याची जबाबदारी संस्थाचालकाची असते. ते चुकीचे झाल्यावर सरकार कारवाई करते पण 3 विद्यार्थींनीचा जीव गेला आहे, यावर राऊत गांधींना सवाल करणार का? आम्ही तर कारवाई करणार आहोतच.
राऊतांना पैसा खाण्याची सवय
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांना पैसा खाण्याची सवय आहेच, त्यांनी जवळपास साडे 9 हजार कोटी रुपये कमावले आहेत. त्या पैशाचे नेमके काय केले हे राऊतांनी सांगावे. पैसे कसे खायचे हे त्यांना चांगलेच माहिती आहे. कामगारांचे शोषण करणारे सुद्धा राऊतच आहेत त्यांनी पैसे खाण्याबद्दल बोलू नये. गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली विकासकामे सुरू आहेत. तिथे स्टील हब निर्माण केले जात आहे, रस्ते होत आहेत, आरोग्य यंत्रणा उभारली जात आहे. गडचिरोलीत उद्योग येत असेल तर ते विकासाच्या दृष्टीने चांगलेच आहे.
हे ही वृत्त वाचा
निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात पक्षचिन्ह दिले!:शिवसेना सुनावणी आणि संसदेतील मोदी-शहांच्या अनुपस्थितीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत सडकून टीका केली. राज्यातील आदिवासी भागात होणारा भ्रष्टाचार, आश्रमशाळेत सर्पदंशाने झालेले मृत्यू, खाण माफियांचा सुळसुळाट आणि शिवसेना पक्षचिन्हाची सुनावणी या सर्वच मुद्द्यांवरून राऊत यांनी सरकारचे वाभाडे काढले.
आश्रमशाळेतील मृत्यू आणि आदिवासी मंत्र्यांवर निशाणा
आदिवासी भागांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत राऊत यांनी संताप व्यक्त केला. “काल एका आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली पाहिजे. यापुढे अशा दुर्घटना घडणार नाहीत याची जबाबदारी निश्चित करून, संबंधित खात्याच्या मंत्र्याला तत्काळ बडतर्फ करावे,” अशी मागणी राऊत यांनी केली. वाचा सविस्तर