Headlines

नागपुरात भीषण अपघात:भरधाव कार उभ्या ट्रकला धडकली, दोन अल्पवयीन मित्रांचा जागीच मृत्यू, 1 गंभीर




मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या आनंदावर काळाने अचानक घाला घातला आहे. नागपुरातील कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिहीर आनंद बेहार, भौमिक अमोल लारोकर आणि सागर संजय मेलवाणी हे तिघे मित्र एका दुसऱ्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. वाढदिवसाच्या पार्टीसाठी इतर मित्र येण्यास काही वेळ असल्याने, मिहीरने आपल्या वडिलांची कार घेतली आणि या दोन मित्रांसह रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी निघाला. उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक पावनगाव ते भरतवाडा वाय पॉईंट रोडवरून जात असताना पहाटेच्या सुमारास मिहीरचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत भौमिक लारोकर आणि सागर मेलवाणी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या कारचालक मिहीर बेहार याला तातडीने उपचारासाठी तारांगण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात आणि मित्रपरिवारात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर डिझेल टँकरचा अपघात 2 जखमी चाळीसगाव-नांदगाव दरम्यान हिरापूरजवळ पेट्रोलपंपासमोर मंगळवारी दुपारी चारला डिझेल टँकर रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात दोन जण जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. अपघातानंतर नाणिजधामच्या विनामूल्य रुग्णवाहिकेची तात्काळ मदत मिळाल्याने जखमींवर वेळेत उपचार सुरू झाले आहेत. चाळीसगावकडून मनमाडच्या दिशेने जाणारा डिझेल टँकर (एमएच 18 बीजी 6825) हिरापूरजवळ अचानक उलटला. या अपघातात टँकरमधील गणेश वाळुंबा देवमुंडे (वय 34) आणि किशोर विश्वनाथ (वय 37, दोघे रा. कुंदनगाव, ता. चांदवड, जि. नाशिक) हे दोघे जखमी झाले.

हे ही वृत्त वाचा

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ भीषण अपघात:मावळ परिसरातील 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळील हॉटेल शिवालयसमोर मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटून ती दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली. या अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *