Headlines

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा वर्धापन दिन:13 ऑगस्ट रोजी वरळीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन




महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या वतीने स्थापना वर्धापन दिन, परिसंवाद व कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात वरळी डोम नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (NSCI) येथे गुरुवार 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटनाने होणार आहे. यावेळी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या दरम्यान जलप्रशुल्काच्या परिणामाचे मुल्यांकन, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि उपाययोजना याबाबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुस्तिकेचे तसेच पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन निर्धारण, हक्कदारीच्या निकष डिजिटल अहवाल व माहितीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून जलसंपत्तीचे नियमन, जलसंपत्तीच्या शाश्वत आणि प्रभावी वापराबाबत विविध विषयांवर जलसंपदा प्रधान सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती श्वेताली ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवाद आणि चर्चासत्र होणार आहे. या कार्यक्रमात रंज्यांमधून जलसंपदा विभांगांमधील सर्व कार्यकारी संचालक, वरिष्ट अभियंते व पाणी वापर संस्थेचे शेतकरी उपस्थित रहाणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या कार्यशाळेमध्ये प्राधिकरणाचे सदस्य राजेंद्र मोहिते, डॉ. प्रभात जैन यांचे अध्यक्षतेखाली आणि या विषयातील तज्ञ अभियंते, सर्व महामंडळाचे कार्यकारी संचालक, प्राधिकारणाचे माजी अध्यक्ष व सदस्य यांचे उपस्थितीमध्ये विविध तांत्रिक विषयावर चर्चासत्र घडवून आणण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *