Headlines

मोदींनी प्रियंकांना विचारले- कशा आहात तुम्ही?:खरगेंच्या उत्तरावर हशा पिकला, सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शनला नेत्यांची मांदियाळी




पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाह रिसेप्शनला उपस्थित राहिले. यावेळी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एकत्र दिसले. पंतप्रधानांनी प्रियंकांना विचारले- प्रियंकाजी, कशा आहात तुम्ही? यावर त्यांनी उत्तर दिले- मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले- मी तसाच आहे. याच दरम्यान खरगेंनी विनोदी शैलीत म्हटले- तुम्ही थोडे बदलला आहात. खरगेंचे हे बोल ऐकून सर्वजण हसले. रिसेप्शनचे 6 फोटो… लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि व्यावसायिक सारंग लखानी यांचे लग्न जूनमध्येच झाले होते. पण रिसेप्शन सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झाले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभा खासदार सोनिया गांधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा, अभिनेते अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, फरहान अख्तर, रवी किशन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सारंग यांचे वडील अरुण लखानी विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, आणि नुकतेच ते महाराष्ट्र विधान परिषदेसाठी बिनविरोध निवडून आले होते. तर, सारंग विश्वराज ग्रुपचे कार्यकारी संचालक आहेत. रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *