Headlines

Tampering in OMR-OSM; 300 candidates passed, … ABVP will protest in 1200 universities


  • Marathi News
  • National
  • Tampering In OMR OSM; 300 Candidates Passed, … ABVP Will Protest In 1200 Universities

रांची12 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

झारखंड लोक सेवा आयोगाच्या(जेपीएससी) परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या सीआयडी तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. ऑप्टिकल मार्क रीडर (ओएमआर) शीट व ऑन स्क्रीन मार्किंगमध्ये (ओएसएम) छेडछाड करून नोकऱ्या विकल्या गेल्याचे उघड झाले. परीक्षा एजन्सी टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रा. लि. चा कर्मचारी उस्मान याने चौकशीदरम्यान ही कबुली दिली. उस्मानच्या सांगण्यानुसार ओएमआर व ओएसएममध्ये छेडछाडीचे काम एजन्सीचे कर्मचारी हेमंत व संजय करत होते. यांनी पैसे घेऊन ३०० उमेदवारांना पास केले. यात फॉरेस्ट ऑफिसर परीक्षेत १००, नागरी सेवा पीटीमध्ये १०० १०० उमेदवार आहेत.

सीआयडीने माजी सदस्य डॉ. जमाल यांना विचारले- टीडीपीएलला

सीआयडीच्या पथकाने बुधवारी जेपीएससीचे माजी सदस्य डॉ. जमाल अहमद यांची सुमारे पाच तास चौकशी केली. ही चौकशी टीडीपीएलचा मार्केटिंग मॅनेजर अभय तिवारी याने लावलेल्या आरोपांवर केंद्रित होती. डॉ. जमाल मध्यस्थांमार्फत उमेदवारांकडून पैसे उकळायचे, असे तिवारीने सीआयडीला सांगितले होते. डॉ. जमाल यांनी आरोप फेटाळून लावत सांगितले की, माझा मध्यस्थाशी कोणताही संबंध नाही. सीआयडीने संशयास्पद टीडीपीएलला प्रवेशावरही प्रश्न विचारले.

झारखंड… अभाविप १२०० विद्यापीठांत आंदोलन करणार

रांची | झारखंडमध्ये जेपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ बुधवारी १९ व्या दिवशी आंदोलन आणखी तीव्र झाले. अभाविपने (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) देशभरातील १२०० विद्यापीठांत धरणे व निदर्शने करण्याची घोषणा केली.एबीव्हीपीचे सरचिटणीस वीरेंद्र सिंह सोळंकी यांनी बुधवारी सांगितले की, झारखंड सरकारने तातडीने सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत. सोळंकी यांनी आरोप केला की झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन हुकूमशाही प्रवृत्ती अवलंबत आहेत. पलामू येथे बुधवारी छात्र न्याय सत्याग्रह संघटनेने काळ्या फिती लावून मोर्चा काढला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *