Headlines

लासलगाव बाजार समितीत डाळिंब, पपई आणि पेरूच्या लिलावास प्रारंभ:मुहूर्ताच्या डाळिंबाला 5,100 रुपये प्रतिक्रेट दर; दिवसभर 305 क्रेटची आवक‎



येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात डाळिंबासह पपई व पेरूच्या लिलावास सुरुवात करण्यात आली. नाशिकसह अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील विविध तालुक्यांमध्ये डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर लागवड होत असल्याने शेतकऱ्यांना मालविक्रीची

.

जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव व सिन्नरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगाखेड, वैजापूर व कन्नड आदी तालुक्यांतील गावांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड करतात. डाळिंब उत्पादकांनी शेतमालाची योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

डाळिंब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असल्याने स्पर्धात्मक बाजारभावातून योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे. डाळिंब खरेदीस इच्छुक व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्यास त्यांना तत्काळ परवाना देऊन पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. निलेश दरेकर ( रा. विंचूर) या शेतकऱ्याच्या डाळिंब क्रेट्सचे उपस्थित शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. मुहूर्ताचा डाळिंब ५,१०० रुपये प्रतिकरेट दराने मदिना फ्रुट ॲन्ड व्हेजीटेबल कंपनीने खरेदी केला. दिवसभरात ३०५ क्रेट्सची आवक झाली. डाळिंबाचा बाजारभाव किमान १०० रुपये, कमाल २,५०० रुपये व सर्वसाधारण १,५०० रुपये प्रतिक्रेट राहिला. यावेळी पपई व पेरूच्या शेतीमालाचेही लिलाव करण्यात आले. पपईची दिवसभरात १५ क्रेट्सची आवक होऊन बाजारभाव किमान २०० रुपये, कमाल ४६० रुपये व सर्वसाधारण ४०० रुपये प्रतिकरेट राहिला. पेरूची १० क्रेट्सची आवक झाली. त्याचा बाजारभाव किमान ६०० रुपये, कमाल १,२०० रुपये व सर्वसाधारण १,००० रुपये प्रतिकरेट राहिला. बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, प्रभारी हिरालाल सोनारे, पंकज होळकर आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *