![]()
श्रावणाच्या पहिल्याच दिवशी भंडारदरा परिसरातील डोंगररांगांनी हिरवा शालू पांघरला आहे. अकोले तालुक्यात जूनपासून १२ ऑगस्टपर्यंत ५५१.१ मिमी पाऊस झाला. सामान्य २९६.३ मिमीच्या तुलनेत तो १८६ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत झालेल्या २५४.४ मिमीच्या तुलनेत यंदाचा पाऊस २९६.७ मिमीने अधिक आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसात ११६.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. डोंगररांगांवरची ही हिरवाई यंदाच्या दमदार पावसाची साक्ष देत आहे. अकोले तालुक्याची एकूण सरासरी ४८८.५ मिमी आहे. मान्सूनच्या मध्यावरच सरासरी ओलांडली आहे. छाया : विलास तुपे, राजूर अकोल्यात पावसाची अशी ‘सर्कलवारी’! अकोले तालुक्यातील १२ सर्कलमध्ये पावसाचे मोठे वैविध्य दिसते. वाकीमध्ये सर्वाधिक १,०३५.२ मिमी, तर शेंडीमध्ये ९६२.९ मिमी पाऊस झाला. राजूरमध्ये ६४९.४, खिरविरेत ६३५.८ आणि साकीरवाडीत ५७९.३ मिमी नोंद झाली. याउलट लिंगदेवमध्ये केवळ २४८, वीरगावमध्ये २८५.५ आणि ब्राह्मणवाड्यात ३३७.८ मिमी पाऊस झाला आहे.
Source link
अकोल्यात मान्सूनच्या मध्यातच 112 टक्के पावसासह श्रावणाचे दमदार स्वागत