![]()
लासूरगाव (ता. वैजापूर) येथील मराठवाड्याची कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी मातेच्या यात्रेला आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. १९ एप्रिलला अक्षय तृतीया, रविवारी दाक्षायणी देवीच्या यात्रेची सांगता होणार आहे. शुक्रवार देवीचा शेवटचा वार असल्याने १७ एप्रिल रोजी मंदिरात आतापर्यंतच्या तुलनेत सर्वाधिक गर्दी झाली होती. दिवसा उन्हामुळे सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत मंदिर भाविकांनी फुलून गेले होते. कात्रड (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील देवीचे भक्त पोपटराव लांडगे यांनी समर्थ अर्थमूव्हर्स मित्र मंडळाकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंदिराच्या वतीने पोपटराव लांडगे यांचा सत्कार करण्यात आला. ५ एप्रिल रोजी श्री देवी दाक्षायणी मातेच्या वस्त्रालंकाराने यात्रेला सुरुवात झाली होती. आतापर्यंत तीन लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले आहे. उष्णतेमुळे दिवसा कमी. रात्री गर्दी वाढत आहे. वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून दर्शन रांगेतील भाविकांना पूजा व आरतीचा मान देण्याची परंपरा सुरू आहे. तेरा दिवसांत दररोज तीन वेळा होणाऱ्या आरतीचा मान ३९ सपत्नीक भाविकांना मिळाला. यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने मंदिरातील संपूर्ण व्यवस्थापन. भाविकांच्या सुविधांचा आढावा दररोज दोन वेळा घेतला जातो, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे यांनी दिली. शुक्रवारी गारज येथील रांगोळी चित्रकार भगवान सरोवर यांनी देवीच्या दर्शनी भागासमोर अप्रतिम रांगोळी रेखाटली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ती आकर्षक ठरली.
Source link
‘दाक्षायणी’च्या यात्रेची उद्या सांगता:2 दिवस शिल्लक राहिल्याने लासूरगावकडे ओघ