Headlines

Sanjay Raut Alleged Over 2000 Crore Deal; BJP Navnath Ban Counter Attack


शिवसेना हा विचारांवर चालणारा पक्ष आहे, तो पैशाने विकत घेता येत नाही. त्यामुळे राऊतांनी याचा हिशोब दिला पाहिजे की उबाठा गट काँग्रेसला किती हजार कोटी रुपयांमध्ये विकला. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला उबाठा बांधण्यासाठी उद्धव ठाकरेंची किती

.

नवनाथ बन म्हणाले की, सुप्रीम कोर्टात खरी शिवसेना कोणाची यावर युक्तिवाद सुरू आहे आणि संजय राऊत यांना कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकूण उकळ्या फुटत आहेत. सिब्बल लढत आहेत त्यामुळे निकाल आपल्याच बाजूने लागेल असे राऊतांना वाटत आहे. 2019 मध्ये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यासाठी किती हजार कोटी रुपयांची डील झाली. 10 हजार कोटी रुपयांमध्ये ही डील झाल्याची माहिती मला मिळाली आहे, त्यातील 2 हजार कोटी रुपये दलाली संजय राऊत यांनी घेतली आहे. यामध्ये बाळासाहेबांचे विचार असणारी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली.

सिब्बलांच्या युक्तिवादाने राऊतांना उकळ्या

नवनाथ बन म्हणाले की, कपिल सिब्बल यांनी काँग्रेसकडून अनेक प्रकरणामध्ये युक्तिवाद केला आहे. बाबरी प्रकरण, ट्रिपल तलाक, नोटबंदीच्या विरोधात याचिका, गुजरात दंग्या प्रकरणी त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे राऊतांचा आनंद फार काळ टिकणार नाही. राममंदिर प्रकरणावेळी कपिल सिब्बल हिंदू्च्याविरोधात जात युक्तिवाद करत होते. परंतु तिथे ते तोंडावर आपटले. खरी शिवसेना कोणाची याचा निकाल जनतेच्या कोर्टात लागला असून जनतेने सांगितले आहे की खरी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करत आहे.

ठाकरेंच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळेच ही वेळ

नवनाथ बन म्हणाले की, निवडणूक आयोग हे कायद्यानुसार निर्णय देते. त्यांनी बघितले की सर्वांत जास्त आमदार-खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत म्हणून त्यांनी तो निर्णय दिला होता. राऊतांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे. तुमच्याकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले होते, पण तुम्ही त्या काळात काहीच काम केले नाही, लोकांना भेटले नाही म्हणून ही परिस्थिती झाली.

हे ही वृत्त वाचा अमित शहांच्या दबावाखाली 5 हजार कोटींना शिवसेना विकली:शहांना उपपंतप्रधान व्हायचे आहे पण मोदींनी नकार दिला- संजय राऊत

केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली येऊन शिवसेना पक्ष आणि चिन्ह 5 हजार कोटी रुपयांना एकनाथ शिंदे यांना विकल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आमदार फोडणे, त्यांचा गुजरात ते गोवा प्रवास, आणि निवडणूक आयोग मॅनेज करणे यासाठी जनतेचा तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून यामध्ये निवडणूक आयोगाने दलालाची भूमिका पार पाडल्याचा घणाघात राऊत यांनी केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.