Headlines

Maharashtra ST NCMC Smart Card Update; Pratap Sarnaik Statement


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डला संपूर्ण राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. 12 ऑगस्ट 2026 पर्यंत राज्यातील 1 कोटी 1 ल

.

एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दृष्टीने महामंडळाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ यांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण केले जात आहे. येत्या 1 सप्टेंबर 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतींच्या प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड पूर्णपणे अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर एनसीएमसी स्मार्ट कार्ड मिळवून घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

15 ऑगस्टपासून शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची नोंदणी

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी स्वतः प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी इतर कोणत्याही ठिकाणी अनधिकृत नोंदणी करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड सर्व अधिकृत एसटी आगार, मुख्य बसस्थानके आणि एसटीच्या अधिकृत एजंट नेटवर्कद्वारे उपलब्ध करून दिले जात आहे. याच माध्यमातून कार्ड रिचार्ज करण्याची सोयही उपलब्ध आहे.

लालपरीचा प्रवास काळानुरूप आधुनिक करणार- सरनाईक

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. या ‘लालपरी’चा प्रवास आधुनिक, डिजिटल आणि सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एनसीएमसी कार्डला मिळालेला उदंड प्रतिसाद हा प्रवाशांचा या डिजिटल परिवर्तनावरील विश्वास दर्शवतो. भविष्यात ‘प्रवासी प्रथम’ या भूमिकेतून तंत्रज्ञानाचा वापर वाढवून एसटीच्या प्रवासाला नवे डिजिटल रूप देऊ. हे ही वृत्त वाचा पुढचं आंदोलन थेट वर्षावर, पाण्याच्या टाकीवरच बसणार:मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा; म्हणाले- बावनकुळे वाटोळं करायला बसलेत

“येत्या 29 ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही. मराठे मोठ्या संख्येने मुंबईला येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईला जाऊन मला बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत… शेअर मार्केटचा बैल पाहायचा आहे, विमान कसं उडतं ते पाहायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं ‘वर्षा’ निवासस्थान कसं आहे, तेही बघायचं आहे. मला तर वाटतंय की आता ‘वर्षा’वरच उपोषणाला बसलेलं बरं राहील. तिथे फडणवीसांनी जी पाण्याची टाकी ठेवली आहे, त्याच पाण्याच्या टाकीवर मी उपोषणाला बसणार आहे,” असा थेट आणि आक्रमक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.