![]()
अमळनेर तालुक्यातील मारवडयेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचाभोंगळ कारभार समोर आला आहे.गुरुवारी रात्री उपचारासाठीआलेल्या एका बालिकेला आरोग्यकेंद्राला कुलूप असल्यानेउपचाराविना परतावे लागले. याप्रकारामुळे खेडी येथील ग्रामस्थांनीतीव्र संताप व्यक्त केला असून हेआरोग्य केंद्र नक्की कुणाच्याभरवशावर सुरू आहे, असा प्रश्नउपस्थित केला जात आहे. तालुक्यातील खेडी येथील प्रवीणजगन्नाथ पाटील यांची मुलगीगुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारासघरात चक्कर येऊन पडली.त्यामध्ये ती जखमी झाली. गावातवैद्यकीय सुविधा नसल्यामुळे तिचेवडील तिला तातडीने मारवडयेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातघेऊन गेले. मात्र, कोट्यवधी रुपयेखर्च करून उभारलेल्या या सुसज्ज आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारालाच कुलूप होते. रात्रपाळीत एकही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता. अखेर उपचार न मिळाल्याने वडिलांना आपल्या जखमी मुलीला घेऊन माघारी फिरावे लागले. मारवड हे पंचक्रोशीतील मुख्य आरोग्य केंद्र असून त्याअंतर्गत चार उपकेंद्रे येतात. मात्र, मुख्य केंद्रातच सेवा कोलमडली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेबाबत खेडी येथील ग्रामस्थ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. अशी माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली. दोन दिवसांत कर्मचारी रात्री उपस्थित राहणार सध्यास्थितीत दवाखान्यासहकर्मचारी निवासाचे बांधकाम सुरु आहे. विजेची सुविधा नसल्यानेकर्मचाऱ्यांना रात्रपाळीस अडचणीयेतात. त्यामुळे ते उपस्थित राहूशकले नाहीत. दोन ते तीन दिवसातकर्मचारी उपस्थित राहतील. असेवैद्यकीय अधिकारी डॉ. साहिलचौधरी यांनी सांगितले.
Source link
मारवडचे प्राथमिक आरोग्य केंद्र "राम भरोसे':रात्रीच्या वेळी कुलूप असल्याने जखमी मुलीला उपचाराविना घरी नेण्याची वडिलांवर आली वेळ