Headlines

उधारीवर गणवेश घेतले अन् सरकारने दिलेले 3.48 कोटी परत गेले:‘समग्र शिक्षा’ची मुदत 30 जून रोजी रात्री संपल्याचा परिणाम; उधारीत गणवेश घेणारे मुख्याध्यापक अडचणीत



समग्र शिक्षा अभियान योजनेची मुदत संपल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशासाठी सरकारकडून आलेला ३ कोटी ४८ लाख ८५ हजार निधी परत गेला आहे. निधी येण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशासाठी शाळांनी पैसे खर्च केले. त्यातून विद्यार्थ्यांना पहिला गणवेश दि

.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समग्र शिक्षा योजनेंतर्गत निधी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या संयुक्त खात्यात येतो. प्रशासनाच्या आदेशानुसार मुख्याध्यापकांनी पहिल्याच दिवशी गणवेश देण्यासाठी उधारीवर खरेदी केली. यासाठी ४ कोटी २२ लाख निधी आला होता. त्यापैकी शिक्षण विभागाने २४० रुपयांप्रमाणे ७३ लाख २३ हजार उपलब्ध केले. ३० जून रोजी मध्यरात्री ३ कोटी ४८ लाख ८५ हजार निधी परत गेला. केंद्राच्या अर्थ विभागाने निधी वितरणाच्या धोरणात बदल केला आहे. आता थेट शाळेच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी ‘एसएनए स्पर्श’ प्रणाली विकसित केली आहे. या नव्या प्रणालीद्वारे रक्कम परत मिळेल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

मोफत गणवेश योजनेची सद्य:स्थिती एकूण पात्र विद्यार्थिनी संख्या ९०,६६१ अनुसूचित जाती पात्र विद्यार्थी १२,२६४ अनुसूचित जमाती पात्र विद्यार्थी ९,८७९ दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी ६,४३३ सामान्य प्रवर्गातील विद्यार्थी ५४,८४४ पीएमश्री शाळेतील विद्यार्थी १,८१९ एकूण पात्र विद्यार्थी १,७५,९००

वितरकांकडून पैशांची मागणी

मुख्याध्यापकांनी उधारीवर गणवेश वाटप केले. आता वितरक पैशांची मागणी करीत आहेत, पण निधी नसल्याने पैसे देता येत नाहीत. मुख्याध्यापकांची अडचण शासनाने दूर करावी. – नितीन नवले, राज्य प्रवक्ते, शिक्षक समिती

दुसऱ्या गणवेशाचा निधी नाही

शालेय व्यवस्थापन समितीद्वारे गणवेश देण्यात येत आहे. यंदा पहिल्या गणवेशाचा निधी पुरेसा आला नव्हता व तो परत गेला. नंतरच्या गणवेशाचा निधी अजून आलेला नाही.- गीता तांदळे, उपशिक्षणाधिकारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *