Headlines

बाधित शेतकऱ्यांचा कळवणला दोन तास ठिय्या‎:पन्नास वर्षांच्या कूळवहिवाटदारांवर अन्याय, कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या निलंबनाची मागणी‎



चाचेर येथील गट क्रमांक ८३ मधील भिल्ल कुटुंबांची ५० वर्षांची वडिलोपार्जित कूळ वहिवाट बेकायदेशिररित्या काढून घेत पोलिस बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या निलंबनाची व चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी विद्रोही आदिव

.

चाचेर येथील शेतजमीन गट क्र. ८३ मधील संपूर्ण मिळकतीवर अनुसूचित जनजाती भिल्ल जमातीमधील केदा वाघ व इतर ८ कुटुंबांचा ताबा १९५७ पासून कायदेशीररित्या चालत आलेला आहे. मूळ मालकाने जमिनीचे त्रयस्थांना हस्तांतरण करताना कुळांना डावलले आणि कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना तहसीलदारांनी अधिकाराचा गैरवापर केला. दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी पोलिसांसह घटनास्थळी जात आदिवासी कुटुंबांना दहशत निर्माण करून जमिनीतून हुसकावून लावले व गुन्ह्यांची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे.

^कायदेशीर प्रक्रिया राबविताना नियम व सत्यता तपासूनच निकाल दिलेला आहे. संबंधितांनी प्रांत कार्यालयासमोर मांडलेल्या ठिय्यामुळे माझे काम चुकीचे आहे, असे समजण्याचे कारण नाही. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीअंती सत्य बाहेर येईल. – रोहिदास वारुळे, तहसीलदार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *