Headlines

आरक्षणात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध:भीमसैनिक दाखवणार मोर्चातून एकजूट, मुक्ताईनगरात बैठक, लवकरच तारीख निश्चित होणार‎




अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावास विरोध दर्शवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील सामाजिक एकता आणि आरक्षणाचा मूळ उद्देश बाधित होईल, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. आरक्षणाचे उपवर्गीकरण न करता त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अनुशेष भरती करून शिक्षण व रोजगाराच्या संधी वाढवाव्यात, अशी मागणी पक्षाने केली. तसेच सर्व समाजघटकांच्या शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी समान योजना राबवण्याचे आग्रही आवाहन करण्यात आले. तालुकाप्रमुख ॲड. राहुल पाटील, तालुका समन्वयक ॲड. देवेंद्र बोदडे, ॲड. अशोक बोद, तालुका संघटक अक्षय पालवे, वसीम मंसुरी, मुकेश कदम आणि दीपक सावळे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उपवर्गीकरणाला विरोध केला. शहर प्रतिनिधी | मुक्ताईनगर अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून मुक्ताईनगर तालुक्यातील बौद्ध समाजबांधव व भीमसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाच्या विरोधात महिनाभरात विराट मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. या वेळी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाची व्यापकता वाढवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीत जाऊन जनजागृती केली जाणार आहे. आंदोलन केवळ मर्यादित न ठेवता हजारो समाजबांधवांच्या सहभागातून विराट स्वरूपात काढण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी गावागावांत संपर्क मोहीम राबवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत उपवर्गीकरणाचा मुद्दा पोहोचवला जाईल. मोर्चाची निश्चित तारीख, मार्ग, प्रमुख मागण्या आणि प्रशासकीय बाबी आगामी बैठकीत ठरवल्या जातील. सध्या संपूर्ण तालुक्यात आंदोलन संघटित करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असून या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कृती समितीची होणार स्थापना मोर्चाच्या प्रभावी आयोजनासाठी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती स्थापन केली जाणार आहे. जनसंपर्क, प्रसिद्धी, नियोजन, वाहतूक, शिस्त आणि अर्थ नियोजन अशा विविध जबाबदाऱ्या स्वतंत्र समित्यांकडे सोपवून कार्यकर्त्यांवर कामांची वाटणी केली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *