Headlines

हर घर तिरंगा अभियानांतर्गत शहरात देशभक्तीपर वातावरणात बाईक रॅली:मनपा वर्धापन दिनानिमित्त झोन क्र. 2 राजापेठच्या वतीने आयोजन‎



मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच देशभरात राबवण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी झोन क्रमांक २, राजापेठ अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन व मनपा शाळा क्रमांक २० यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार १३ रोजी तिरंगा बाईक

.

या तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ दसरा मैदान येथील शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन येथून करण्यात आला. रॅलीमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या वाहनांवर तसेच हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. शहरी आरोग्य केंद्रापासून सुरू झालेली रॅली राजापेठ मार्गे राजकमल चौक आणि त्यानंतर नेहरू मैदान येथे पोहोचली. रॅलीच्या मार्गावर तिरंगा ध्वजांची झालर आणि देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण परिसराचे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.

या तिरंगा बाईक रॅलीचे नेतृत्व झोन क्रमांक २, राजापेठचे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांनी केले. तर झोन क्रमांक २ च्या सभापती स्वाती कुळकर्णी यांनी रॅलीचे अध्यक्षस्थान भूषवले. मनपा प्रशासनाच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने रॅलीला विशेष भव्य स्वरूप प्राप्त झाले.

शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशनच्या स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी खडसे तसेच मनपा दवाखाना आयसोलेशनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र गुल्हाने यांनी आपल्या सहकाऱ्यांना रॅलीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. आरोग्य विभागातील अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा वर्कर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित ‘हर घर तिरंगा’ अभियानाला आपला पाठिंबा दर्शविला.

दसरा मैदान येथून सुरू झालेली रॅली राजापेठ, राजकमल चौक मार्गे नेहरू मैदान येथे पोहोचल्यानंतर तेथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सभापती स्वाती कुळकर्णी, नगरसेवक प्रदीप हिवसे आणि सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी मान्यवरांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रध्वजाचे महत्त्व आणि नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

मनपा शाळा क्रमांक २० चे मुख्याध्यापक वानखडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यांनी तिरंगा बाईक रॅलीच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना मनपा अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग आणि शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी मनपा शाळा क्रमांक २० चे मुख्याध्यापक वानखडेयांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा वर्कर, शिक्षक तसेच रॅलीच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शब्दसुमनांनी आभार व्यक्त केले.

मनपा शाळा क्रमांक २० च्या शिक्षक-कर्मचाऱ्यांचा सहभाग या रॅलीमध्ये मनपा शाळा क्रमांक २० मधील शिक्षिका व कर्मचारी यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक वानखडे यांनी रॅलीच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावत उपस्थितांना ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उद्देश आणि राष्ट्रध्वजाचे महत्त्व अधोरेखित केले.रॅलीमध्ये झोन क्रमांक २ च्या क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण यांच्यासह शहरी आरोग्य केंद्र व मनपा दवाखाना आयसोलेशन येथील अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा वर्कर, इतर कर्मचारी तसेच मनपा शाळा क्रमांक २० मधील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *