Headlines

10 हजारांहून अधिक जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे 3 महिन्यांपासून रखडले:2016 च्या आधीचा जन्म, मृत्यू असलेल्यांना विलंब‎




जन्म-मृत्यू प्रमाणपत्र तेही २०१६ च्या आधीचा जन्म किंवा मृत्यू असलेल्यांचे दाखले मिळणे सध्या महाकठिण झाले आहे. हे दाखले मंजूर करण्याचे अधिकार (आयडी) केवळ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मर्यादित आहेत. ते संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या अर्जांपैकी दिवसभरात फारतर ७० ते ८० अर्जांना मंजुरी देऊ शकतात. त्यामुळे दिवसाला केवळ काही मोजकेच जन्म-मृत्यूचे दाखले निकाली निघत आहेत. त्यामुळे प्रलंबित दाखल्यांची संख्या वाढत असून केवळ शहरात १० हजारावर दाखले प्रलंबित आहेत. हे दाखले दोन ते तीन महिन्यांपासून तांत्रिक कचाट्यात अडकले आहेत. ते वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेकांची जीवनावश्यक कामे रखडली आहेत. काहींना प्रवेशासाठी, काहींना शिष्यवृत्तीसाठी, काहींना पेंशनसाठी तर काहींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी या दाखल्यांची आवश्यकता असतानाही ते मिळत नसल्याने त्यांची कामे रखडली आहेत. जेरीस आलेले नागरिक दररोज मनपा मुख्यालयातील जन्म-मृत्यू विभागात दाखले मिळवण्यासाठी गर्दी करीत असून त्यांची समजूत काढताना कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक होत आहे. जर आधीप्रमाणे मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी व निबंधकांकडे आयडी असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखले प्रलंबित राहिले नसते. परंतु, या अधिकाऱ्यांवर गैरप्रकार केल्याचा आरोप असल्याने त्यांच्याकडे आयडी राहिली नाही. परिणामी दाखले वेळेवर मिळणे अवघड झाले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, डिजिटल जगात किंवा कोणत्याही यंत्रणेत एखाद्या व्यक्तीची, वस्तूची किंवा खात्याची खास ओळख पटवण्यासाठी वापरले जाणारे नाव, नंबर किंवा कोड म्हणजेच आयडी होय. ही आयडीच आता जन्म-मृत्यू दाखले मिळण्याच्या मार्गातील मुख्य अडथळा ठरली आहे.या दाखल्यांची आवश्यकता असतानाही ते मिळत नसल्याने त्यांची कामे रखडली आहेत. अंतिम मंजुरी डीएचओंकडे Q. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यास विलंब का होत आहे? A. शासनाने डीएचओंकडे मंजुरीची आयडी दिली असून त्यांना दिवसभरात जिल्ह्यातील ७० ते ८० अर्जच मंजूर करता येतात. Q. मनपाकडे प्रमाणपत्र देण्याची आयडी नाही काय? A. डेटा देण्याची आयडी असली तरी अंतिम मंजुरी ही डीएचओंकडे आहे. त्यामुळे दाखले मिळण्यास विलंब होत आहे. Q. शहरात गेल्या चार महिन्यांत प्रलंबित दाखले किती आहेत? A. १० हजारावर दाखले प्रलंबित आहे. Q. नेमके कोणते दाखले प्रलंबित राहात आहेत? A. ज्या दाखल्यांची ऑनलाईन नोंद नाही, असे २०१६ च्या आधीचे दाखले प्रलंबित राहात असून विलंबाने दाखल करण्यात आलेले दाखलेही प्रलंबित आहेत. डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा. १५० पैकी दिवसभरात ७० प्रमाणपत्रच मंजूर जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) यांना शासनाकडून दिवसभरात फारतर ७० जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मंजूर करण्याची आयडी दिली आहे. मनपाच्या उपनिबंधकांकडे दिवसभरात १५० जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज येत असून त्यापैकी जर ७० प्रमाणपत्रांनाच मंजुरी मिळत असेल तर एकाच दिवसात ८० प्रमाणपत्र थकित राहतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *