![]()
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विविध परीक्षा व शैक्षणिक शुल्कांमध्ये केलेली अवाजवी वाढ तातडीने कमी करावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) ने केली आहे. यासंदर्भात सिनेट सदस्य कैलास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांना साकडे घालण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने अलिकडेच डुप्लिकेट मार्कशीट, मायग्रेशन सर्टिफिकेट, डिग्री, अग्रेशन सर्टिफिकेट तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित विविध शुल्कांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ही वाढ झाल्याने विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळेच विद्यापीठाने शुल्कवाढीचा फेरविचार करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. दरम्यान कुलगुरुंशी झालेल्या चर्चेअंती विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाचा पाढाही वाचण्यात आला. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून वाढीव शुल्क तातडीने कमी करावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान मागणी मान्य न झाल्यास एआयएसएफच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील सिनेट सदस्य कैलास चव्हाण यांनी दिला.यावेळी एआयएसएफच्या राज्य सचिव प्रतीक्षा ढोके, इतर पदाधिकारी योगेश चव्हाण, शुभम शेरेकर आदी उपस्थित होते. तरतुदीपेक्षा अधिक वाढीमुळे अडचण दर दोन वर्षांनी नियमानुसार १० टक्के शुल्कवाढ करण्याची तरतूद असताना त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ करण्यात आली आहे. एवढी वाढ करणे योग्य नाही. विशेषतः डुप्लिकेट मार्कशीट व मायग्रेशन सर्टिफिकेटसारख्या आवश्यक कागदपत्रांचे शुल्क वाढविण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे,
Source link
अवाजवी शुल्कवाढ तातडीने कमी करावी; कुलगुरुंना घातले साकडे:मागणी मान्य न झाल्यास एआयएसएफचा आंदोलनाचा इशारा