Headlines

नाशिक पुन्हा भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरले:3.4 रिश्टर तीव्रतेची नोंद, नागरिकांमध्ये घबराट




नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी नोंदवण्यात आली. धक्के जाणवताच अनेक नागरिक खबरदारी म्हणून घराबाहेर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या मालमत्तेच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून धक्क्यांची मालिका नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शहरासह काही ग्रामीण भागातही या धक्क्यांची तीव्रता जाणवत असल्याने प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नसली तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वीही जाणवले होते भूकंपाचे धक्के याआधीही गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी रिश्टर स्केलवर 4.3 तीव्रतेची नोंद झाली होती. इंदिरानगर, पंचवटी, हिरावाडी, मेन रोड, पाथर्डी फाटा तसेच जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातही नागरिकांना धक्के जाणवले होते. काही ठिकाणी घरातील भांडी आणि हलक्या वस्तू हलल्याचे प्रकार घडले होते. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आजच्या भूकंपानंतर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून कोणतीही मोठी हानी झालेली नसल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हेही वाचा.. राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग: विदर्भासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास महत्त्वाचे, IMD चा यलो अलर्ट राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या घाटमाथा भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *