Headlines

गुजरातच्या भरूच येथील औषध कारखान्यात स्फोट, 5 ठार:6 जखमी; विषारी वायूची गळती झाल्यामुळे घटनास्थळी उडाला गोंधळ




गुजरातच्या भरूच येथील सिंजील फार्माकेम नावाच्या औषधनिर्मिती कारखान्यातील रिअॅक्टरच्या स्फोटात ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत इतर ६ जण जखमीही झालेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटानंतर लगेचच कारखान्यात मिथाइल डाय-क्लोराइड नामक विषारी वायूची गळतीही सुरू झाली. त्यामुळे तेथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सध्या हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. अपघाताशी संबंधित छायाचित्रे… बातमी अपडेट होत आहे…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *