Headlines

अमरावती‎:3.93 लाखांच्या एमडीसह दोघांना पोलिसांनी पकडले




नागपुरी गेट पोलीसांनी एमडी विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २०.६२ ग्रॅम एमडी, दुचाकी आणि मोबाईलसह एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूरी गेट पोलिसांचे पथक १५ ऑक्टोंबरला गस्तीवर होते. त्यावेळी अंसार नगर भागातील दोघे ॲकॅडेमिक ग्राऊंड परिसरात काळ्या रंगाच्या दुचाकीवरून एमडी विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती ठाणेदार मनोहर कोटनाके यांना मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार कोटनाके यांनी पथकासह सापळा रचला. संशयितरीत्या फिरणाऱ्या फैजान खान अनिस खान (२५) आणि शहबाज खान इस्माईल खान (२५, दोघेही रा. अंसार नगर, अमरावती) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत ३ लाख ९३ हजार रुपयांचे २०.६२ ग्रॅम ”एमडी”, दुचाकी, दोन स्मार्ट मोबाईल व ७०० रुपयांची रोख जप्त करण्यात आली. चौकशीत त्यांनी हे ड्रग्ज अब्दुल काशिफ अब्दुल कलीम (रा. धरमकाटा) याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. याप्रकरणी या दोघांसह त्याच्याविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. २४ तासांत पोलिसांची शहरात दुसरी कारवाई राजापेठ पोलिसांनी १५ ऑक्टोंबरला पहाटेदरम्यान एमआयडीसीमध्ये २५ ग्रॅम एमडी जप्त केली होती. त्यामध्ये दोघांना अटक केली होती. त्यानंतर काही तासातच नागपूरी गेट पोलिसांनी दोघांकडून २० ग्रॅम एमडी जप्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *