Headlines

ऑरिकसाठी 3200 हेक्टर जमिनीच्या मोजणीला पुढील आठवड्यात प्रारंभ:6 गावांतील बाधित शेतकऱ्यांची संख्या 3 हजारांवर




ऑरिक सिटीच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी बिडकीन औद्योगिक क्षेत्रात नव्याने ३२०० हेक्टर (सुमारे ८ हजार एकर) जमिनीच्या मोजणीस पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक गावात संयुक्त मोजणीसाठी स्वतंत्र पथक तैनात असणार असून, एका महिन्यात मोजणी पूर्ण झाल्यावर जमिनीच्या दरनिश्चितीसाठी वाटाघाटी केल्या जातील. ऑरिकच्या विस्तारासाठी एमआयटीएल प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर शासनाने उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांची विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादन प्रक्रियेचा भाग म्हणून नोटिसाही पाठवल्या आहेत. ऑरिकच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पैठण तालुक्यातील पाडळी व निलजगाव, तर संभाजीनगर तालुक्यातील घारदोन, घारदोन तांडा, खोडेगाव आणि गाडीवाट या ६ गावांमधील भूसंपादन करण्यात येणार आहे. महिनाभरात जमिनीची मोजणी पूर्ण करून एका वर्षात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेत प्रत्येक भूखंडाची मोजणी, सीमानिश्चिती, जमिनीवरील स्थावर मालमत्ता, घरे, बांधकामे, विहिरी, झाडे, फळझाडे व रस्ते यांची अधिकृत नोंद घेण्यात येणार आहे. प्रत्येक गावात जमीन मोजणीसाठी स्वतंत्र पथक मोजणी करण्यात येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये ४ ते ५ सदस्यांचे अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक कार्यरत राहील. यामध्ये भूमी अभिलेख आणि सर्वेक्षण विभाग, वन विभाग, कृषी विभाग तसेच एमआयडीसीचे अधिकारी समाविष्ट असतील. नोटीस मिळाल्यावर १ महिन्यात हरकती नोंदवा संबंधित जमीनधारकांना भूसंपादनाबाबत हरकती असल्यास, नोटीस मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत हरकती नोंदवता येतील. त्यानंतर भूसंपादनाची पुढील कार्यवाही केली जाईल. ऑरिक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ३ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे. मोजणीनंतर शेतकऱ्यांसोबत दरनिश्चितीसाठी वाटाघाटी करण्यात येतील. ६ गावांतील जमिनी ऑरिकसाठी घेणार गाव भूसंपादन क्षेत्र
पाडळी२२० हेक्टर
निलजगाव…………………६४४ हेक्टर
घारदोन……………………६८७ हेक्टर
घारदोन तांडा५०० हेक्टर
खोडेगाव६०० हेक्टर
गाडीवाट……………………५०० हेक्टर पहिल्या टप्प्याला मोठा प्रतिसाद ऑरिक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शेंद्र्यामध्ये २ हजार तर बिडकीनमध्ये ८ हजार एकर जमिनीचे संपादन केले होते. यापैकी ९० टक्क्यांहून अधिक भूखंडांचे वाटप पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या कंपन्यांच्या आगमनानंतर आता येथे ऑटो ॲन्सिलरी उद्योगांकडून भूखंडांसाठी मागणी होत आहे. कमी वेळेत नवे उद्योग येण्याची शक्यता असल्याने प्रशासनही तत्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. मोजणीनंतर दरासाठी वाटाघाटी पुढील आठवड्यापासून बिडकीन ऑरिक प्रकल्पाच्या अतिरिक्त जमिनीच्या मोजणीस सुरुवात करण्यात येत आहे. प्रत्येक गावामध्ये मोजणीसाठी विविध विभागांचे स्वतंत्र पथक राहील. त्यानंतर शेतकऱ्यांशी दरनिश्चितीसंदर्भात वाटाघाटी केल्या जातील. – एकनाथ बंगाळे, विशेष भूसंपादन अधिकारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *