Headlines

राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग:विदर्भासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास महत्त्वाचे, IMD चा यलो अलर्ट




राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या घाटमाथा भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतापासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, वातावरणात तयार झालेल्या हवेच्या जोडक्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भासह कोकण आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जळगावच्या मेहरूण तलावातील पाणीसाठ्यात वाढ गेल्या काही दिवसांतील पावसामुळे जळगावमधील मेहरूण तलावातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. तलाव सुमारे 78 टक्के भरला असून गणेशघाटावरील अनेक पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. तलावातील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिका आणि शेतीसाठीच्या जलस्रोतांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तलावातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली होती; मात्र अलीकडील पावसामुळे परिस्थितीत सुधारणा झाली आहे. उपग्रह नकाशात मान्सूनच्या ढगांची स्थिती पाहा देशातील अनेक राज्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहारसह एकूण 14 राज्यांमध्ये जोरदार पाऊस आणि ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या डोंगराळ भागांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन पुढील 24 तासांत काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः घाटमाथा आणि पूरप्रवण भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगर: ३० दिवसांत २१ दिवस कोरडे; ८ दिवस ५ मिमीपेक्षा कमी पाऊस गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पावसाचा मोठा लहरीपणा पाहायला मिळाला आहे. १२ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत बहुतांश २१ दिवस कोरडे गेले असून, ८ दिवस ५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर केवळ दोनच दिवस १० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, १२ जुलै रोजी मोसमातील एकूण पाऊस २६७.५ मिमी होता, तो १२ ऑगस्टपर्यंत ३६१.४ मिमीवर पोहोचला. म्हणजेच महिनाभरात केवळ ९३.९ मिमी पावसाची भर पडली. यातही ३१ जुलै (६४.१ मिमी) आणि १ ऑगस्ट (१४.२ मिमी) या दोनच दिवसांत सर्वाधिक (एकूण पावसाच्या ६८ टक्के) पाऊस झाला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून, ६, ८, ९ आणि १० ऑगस्ट रोजी पावसाची नोंद शून्य होती.१८ ऑगस्टपर्यंत शहरात मोठ्या पावसाचा कोणताही इशारा नाही. जळगाव‎: आजपासून चार दिवस पाऊस श्रावणाच्या सुरुवातीलाच हवामानात मोठा ‎‎बदल होत असून, पावसासाठी पुन्हा एकदा ‎‎अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. ‎‎बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी ‎‎दाबाच्या क्षेत्रामुळे आणि मान्सून ट्रफ‎सक्रिय झाल्याने १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान ‎‎पावसाची शक्यता आहे.‎ १४ ऑगस्टला मध्यम पावसाची शक्यता ‎‎आहे. १५ ऑगस्टला पावसाची थोडी‎उघडीप राहील. या दिवशी पाऊस तुरळक‎ते हलका असेल. १६ आणि १७ ऑगस्ट या‎ दोन दिवशीही पाऊस होईल. नागपंचमीच्या‎दिवशी पावसाचा जोर अधिक वाढणार.‎ हेही वाचा.. मान्सून प्रणाली आता MPच्या पूर्व भागात सक्रिय:यूपीत 80 हून अधिक गावे पुराच्या विळख्यात, बिहारच्या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट मध्य प्रदेशच्या पश्चिम भागाला जलमय केल्यानंतर आता मान्सूनची मजबूत प्रणाली पूर्व भागात सक्रिय होईल. शुक्रवारपासून जबलपूर, रीवा आणि शहडोल विभागातील जिल्ह्यांमध्ये 3 दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या मते, 24 तासांत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 4 इंच किंवा त्याहून अधिक पाऊस पडू शकतो. उत्तर प्रदेशात गुरुवारी हवामान बदलले. गोरखपूर, आझमगढसह 15 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. नद्यांना पूर आल्याने 16 जिल्ह्यांमधील 80 हून अधिक गावे पुराच्या विळख्यात आहेत. सर्वाधिक फर्रुखाबादमध्ये 49 गावांना पुराचा फटका बसला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *