Headlines

शालार्थ घोटाळा:चव्हाणची ‘माया’ डोळे दिपवणारी, नाशिकचा निलंबित शिक्षण उपसंचालक संभाजीनगरचा रहिवासी




नाशिक विभागात उघडकीस आलेल्या शालार्थ घोटाळ्यातील आरोपी शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानपूर (ता. खुलताबाद) येथील रहिवासी आहे. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या चव्हाण याने अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. चव्हाण आणि त्याच्या पत्नीने विविध व्यावसायिक फर्म तयार केल्या. यात दोन कंपन्या देखील आहेत. केवळ नोकरी करत असताना मिळालेल्या वेतनाच्या आधारे हे डोळे दिपवणारे साम्राज्य उभे करणे निव्वळ अशक्य आहे. बी. बी. चव्हाण याच्या नोकरीचा बहुतांश कार्यकाळ छत्रपती संभाजीनगर विभागातच गेला. शिक्षक, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, सहायक शिक्षण संचालक आणि उपसंचालक असा त्याचा नोकरीतील प्रवास आहे. तो नाशिक येथे उपसंचालक पदावर कार्यरत होता. शालार्थ घोटाळ्यातील सहभागामुळे सध्या तो निलंबित असून फरार आहे. कबीर कोर्ट हॉटेल, तिसगाव सिडको महानगरात रेशीमबंध मंगल कार्यालयाजवळच कबीर कोर्ट हॉटेल आहे. इथे फूड कोर्ट, भव्य असा बँक्वेट हॉल आहे. लग्न, स्वागत समारंभ, वाढदिवस अशा कार्यक्रमांसाठी येथील बँक्वेट हॉल भाड्याने दिला जातो. तारखेनुसार आणि सीझननुसार त्याचे भाडे आकारले जाते. काय आहे चव्हाणचे नाशिक प्रकरण? चव्हाणने शालार्थ आयडी घोटाळ्याच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधींचा चुना लावल्याचा आरोप आहे. नाशिक विभागातील साडेआठशे शिक्षकांच्या मान्यता बोगस असल्याचे एसआयटीने उघड केल्यानंतर चव्हाणसह अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून चव्हाण पसार आहे. नाशिक पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या मालमत्तांचीही चौकशी केली जात आहे. मकोका कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव शालार्थ आयडी प्रकरणात निवृत्त शिक्षण उपसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कट रचून केलेली संघटित गुन्हेगारी असल्यामुळे नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बी. बी. चव्हाणसह अन्य अधिकाऱ्यांवर मकोका कायद्यानुसार कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. रेशीमबंध मंगल कार्यालय, वाळूज सिडको महानगरजवळ अत्यंत प्रशस्त असे हे रेशीमबंध मंगल कार्यालय आहे. एका कार्यासाठी प्रतिदिन सुमारे ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंतचे भाडे आकारले जाते. जवळपास १० हजार चौरस फूट जागेत हे मंगल कार्यालय आहे. भद्रा ब्रीडिंग फार्मसाठी घेतले २ कोटी अनुदान सुलतानपूर येथे अत्याधुनिक भद्रा ब्रीडिंग फार्म आहे. येथे गीर, जर्सी आणि होल्स्टिन फ्रिजिएन, गिरलँडो जातीच्या तब्बल ७०० गायी आहेत. या फार्मसाठी केंद्र सरकारच्या गोकुळ मिशनमधून २ कोटींचे अनुदान घेतले आहे. येथे परदेशी गोवंशाच्या सिमेनद्वारे ॲम्ब्रियो ट्रान्सफर केले जाते. या आयव्हीएफ तंत्राद्वारे तयार झालेल्या कालवडी एक ते सव्वा लाखांपर्यंत विक्री केल्या जातात. इथॉस मिल्क फूड प्रायव्हेट लिमिटेड इथॉस मिल्क फूड प्रा.लि. कंपनी बी. बी. चव्हाण याची पत्नी वैशाली चव्हाण व मुलगी फाल्गुनी चव्हाण यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. बीड बायपासलगत मुस्तफाबाद या पत्त्यावर ही कंपनी दाखवलेली आहे. गतवर्षीच या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. दूध आणि दुधापासून तयार केलेले उपपदार्थ या कंपनीद्वारे उत्पादित आणि विक्री केले जातात. बी. बी. चव्हाण मिलिटरी स्कूल अँड अकॅडमी खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथे ही अकॅडमी आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पॅरा मिलिटरी सर्व्हिसेसची पूर्वतयारी करवून घेणारी शैक्षणिक संस्था आहे. निवासी स्वरूपाची ही अकॅडमी असून इथे सातवी ते बारावीपर्यंतचे शिक्षणदेखील दिले जाते. एका विद्यार्थ्याकडून तब्बल २ लाख रुपयांपर्यंत फीस घेतली जाते. मालोजीराजे कृषी उत्पादक कंपनी २०१८ मध्ये ही कंपनी स्थापन केलेली आहे. यामध्ये भाऊसाहेब चव्हाण याची पत्नी वैशाली चव्हाण, मेहुणा उमेश निकम व अन्य नातलगांचा समावेश आहे. वैशाली चव्हाण या शिक्षिका असतानाही त्या या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक म्हणून काम पाहतात, हे विशेष.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *