Headlines

फर्दापूर‎:शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी भारतसिंग राजपूत




सोयगाव तालुक्यातील वरखेडी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच पार पडली. या समितीच्या अध्यक्षपदी भारतसिंग ओंकारसिंग राजपूत तर उपाध्यक्षपदी मनोज रामचंद्र नवघरे यांची सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या पालक सभेत विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शाळेच्या प्रगतीबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नव्या व्यवस्थापन समितीची घोषणा करण्यात आली. समितीच्या इतर सदस्यपदी महेश दिलीप मगरे, भाग्यश्री मांगो बागुल, पवनसिंग गजराजसिंग राजपूत, ज्योती अनिल मगरे, आशाबाई मनोज चुंगडे, प्रफुल्ल श्रावण दांडगे आणि सविता दीपकासिंग राजपूत यांची बिनविरोध निवड झाली, तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून रवींद्र मोतीराम साळुंके यांची निवड करण्यात आली. .



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *