Headlines

प्रशासनासमोर आव्हान‎:स्वातंत्र्यदिनी होणार 58 आंदोलने, 13 जणांचा आत्मदहनाचा इशारा




शासन आणि प्रशासनाकडून मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) ५८ आंदोलने होत आहेत. या आंदोलनातील १३ जणांनी थेट आत्मदहन करण्याचा टोकाची भूमिका घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपचिटणीस शाखेने १० ऑगस्टअखेर प्राप्त निवेदनांच्या आधारे विभागनिहाय यादी तयार केली आहे. कार्यालयीन नोंदीनुसार १० ऑगस्ट दरम्यान विविध विभागांशी संबंधित ५८ आंदोलनांची नोंद झाली असून त्यापैकी १३ आत्मदहनाच्या इशाऱ्यांची आहेत. आत्मदहनाचा इशारा हा केवळ आंदोलनाचा प्रकार नसून गंभीर कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करू शकतो. त्यामुळे प्रशासन संबंधित व्यक्तींशी संवाद साधते, त्यांच्या मागण्यांची वस्तुस्थिती तपासते आणि आंदोलन टाळण्यासाठी समुपदेशन व आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करते. नागरिकांनीही मागण्यांसाठी सुरक्षित व कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. ^या प्रकरणी काहींचे समाधान झाले असून, काही जिल्हाधिकारी कार्यालय समोरील आंदोलकांची चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. संबंधित विभाग आणि प्रशासन यामार्फत सकारात्मक पाऊल उचलले जात आहे. तसेच काही विषय शासन स्तरावरील आहेत. याशिवाय आत्मदहनाचे ८ पत्र आले असून, पोलिस यासंदर्भात माहिती घेत आहे. एकंदरीत मागण्यांवर प्रशासन व संबंधित विभाग बैठक घेत असून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हाधिकारी, लातूर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *