![]()
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी नेप्ती गावात तिरंगा रॅली काढली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने झालेल्या या रॅलीत विद्यार्थी-विद्यार्थ िनी सहभागी झाले. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली. ‘हर घर तिरंगा’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी नेप्ती जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात तसेच गावातील विविध भागांत जाऊन तिरंगा अभियानाचे महत्त्व आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान याबाबत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी स्वातंत्र्यसैनिकांच् या त्यागाचे स्मरण करून राष्ट्राच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी युवा जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्यही सादर केले. रॅलीच्या आयोजनासाठी सरपंच संजय जपकर यांनी सहकार्य केले. उपसरपंच एकनाथ जपकर, गजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद शाळेतील नवले, कापसे, पाटोळे मॅडम, गोरे मॅडम उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. अक्षय देखणे तसेच विद्यार्थ्यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
Source link
तिरंगा हातात, देशभक्ती मनात:नेप्तीत छत्रपती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची रॅली