Headlines

'ऑपरेशन टायगर' रोजच सुरू असते, ते सांगून होत नाही:उदय सामंतांचा विरोधकांना इशारा, अंबादास दानवेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर




राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांच्या टीकेला अतिशय खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना सामंत यांनी थेट त्यांना विमानातून एकत्र प्रवास करण्याची ‘ऑफर’ दिली. तसेच, ‘ऑपरेशन टायगर’ आणि आगामी काळातील मुख्यमंत्रिपद या राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. “मांडीवर बसायचे असेल तर त्यांनाही घेऊन जाईन” राज्यातील अनेक लघुउद्योग बंद पडत चालले असून मंत्री फक्त विमानाने प्रवास करत आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली होती. याला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, “ते माझ्या विमानात बसणार असतील, तर त्यांनाही मी सोबत घेऊन जाईन. एवढी जेलसी कशाला असली पाहिजे? त्यांना माझ्या मांडीवर बसायचे असेल, तर त्यांना मी घेऊन जाईन.” राजकारणात अशी चिडचिड करून चालत नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच, चाकणच्या उद्योजकांच्या भेटीवरून विरोधकांना टोला लगावताना ते म्हणाले, “काही लोकांना चाकणच्या उद्योजकांची भेट घ्यावीशी वाटली, यातच सगळ्यांचे भाग्य आहे.” दानवे माझे मित्र आहेत, पण त्यांनी आपण काय करतो हे आधी सांगावे, असे आव्हानही सामंत यांनी दिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना जे दिले ते इतर कोणीही दिले नाही, त्यामुळे उगाच टीका कशाला करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आधी २०२९ ला निवडून येऊन दाखवा” आपल्यावरील सततच्या टीकेला उत्तर देताना सामंत यांनी विरोधकांना थेट २०२९ च्या निवडणुकांचे आव्हान दिले. “जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, त्यांनी आधी २०२९ च्या निवडणुकीत आपापले मतदारसंघ सांभाळावेत. आधी निवडून येऊन दाखवावे आणि मगच माझ्यावर टीका करावी,” असा पलटवार त्यांनी केला. ‘ऑपरेशन टायगर’वर मोठे विधान राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’बद्दल विचारले असता सामंत यांनी सूचक विधान केले. “ऑपरेशन टायगर हे काही सांगून होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय करू शकतात, हे सर्वांना माहीत आहे. हे ऑपरेशन रोजच सुरू असते,” असा दावा त्यांनी केला. “शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांचीच इच्छा” प्रतापराव जाधव यांनी ‘महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत’ असे विधान नुकतेच केले होते. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, “शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, ही सर्वांचीच इच्छा आहे.” या विधानामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय समीकरणांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा.. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह: मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रालयात, एकनाथ शिंदेंनी ठाण्यात तर सुनेत्रा पवारांनी बीडमध्ये केले ध्वजारोहण देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. सविस्तर वाचा ‘स्वातंत्र्यदिनी तरी खोटं बोलू नका’:पंतप्रधान मोदींच्या भाषणावर संजय राऊतांचा घणाघात, मुख्यमंत्री फडणवीसांनाही दिला इशारा स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील विविध मुद्द्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी युवाशक्तीबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेचे स्वागत करतानाच, देशाच्या सत्तेत तरुणांना अधिक संधी देण्याची वेळ आली असल्याचे राऊत म्हणाले. तसेच कोरोना काळातील विरोधकांच्या भूमिकेबाबत मोदींनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *